ठळक बातम्या

या कारणामुळे माझा होशील ना मालिकेतून अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी घेतली माघार

तसं झी मराठी आणि आपला संबंध हा जवळपास वीस वर्षांपासून चा आहे. आधी झी मराठी हे अल्फा मराठी नावाने ओळखलं जातं होत. 27 मार्च 2005 पासून ते झी मराठी ह्या नावाने ओळखलं जाऊ लागलं. गेल्या काही वर्षांत झी मराठी आणि प्रेक्षकांचं नात अजुनच घट्ट झालेलं आहे. झी मराठी वरील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या घराघरात जाऊन पोहचलं आहे. मग ते अगदी आदेश भाऊजी पासून ते अण्णा नाईक पर्यंत. पण मालिका विश्व म्हणलं की थोडेफार बदल हे होतच राहतात.

actress sulekha talwalkarac
actress sulekha talwalkarac

मालिकेतील रंजकता टिकवून ठेवण्यासाठी हे बदल आवश्यक असतात. तसाच काहीसा बदल झालाय झी मराठी वरील माझा होशील ना ह्या मालिकेत. ह्या मालिकेत सईची आई हे पात्र साकारणाऱ्या सुलेखा तळवलकर यांनी ही मालिका सोडल्याची चर्चा आहे. त्यांनी मालिका का सोडली ह्यावर बरीच चर्चा रंगली आहे. पण त्याच खर कारण आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तर मित्रांनो, सुलेखा तळवलकर ह्या मालिकेत शर्मिला बिराजदार नावाच म्हणजेच सईच्या आई च पात्र साकारत होत्या. त्याच वेळी त्या स्टार प्रवाह वरील सांग तू आहेस का? ह्या मालिकेत देखील काम करत होत्या. आता तुम्ही म्हणाल की कलाकार एकाच वेळी वेगवेगळ्या भूमिका साकारत नाहीत का…?, तर ते बरोबर आहे. पण सध्याच्या काळात कोरोना ने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आणि कोरोना मुळे एकाच वेळी दोन्ही मालिकेत काम करणं थोड कठीण जात असल्याने त्यांनी माझा होशील ना ह्या मालिकेतून ब्रेक घेतल्याचे दिसून येत आहे. सुलेखाजी कलाक्षेत्रात गेला बराच काळ कार्यरत आहेत.

maza hoshil na actress
maza hoshil na actress

या काळात त्यांनी उत्तमोत्तम कलाकृतींतून आपल्या समोर विविध व्यक्तिरेखा साकार केलेली दिसून येतात. त्यांनी माझा होशील ना ह्या मालिकेचा निरोप जरी घेतला असला तरीही त्या त्यांच्या नवनवीन प्रोजेक्ट्स मधून आपल्या भेटीला येतच राहणार आहेत. शिवाय त्या एक यू ट्यूब चॅनल सुद्धा चालवतात जिथे त्या वेगवेगळ्या कलाकारांची मुलाखत घेताना दिसतात. आता वर्षा घाटपांडे ह्या यापुढे मालिकेत सईच्या आईच पात्र साकारत आहेत. वर्षाजींना आपण त्यांनी साकारलेल्या विविध भूमिकेमुळे ओळखतो. त्यांनी आतापर्यंत वर्तुळ, हे मन बावरे, ग्रहण अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सावधान इंडिया ह्या मालिकेचा पण त्या भाग होत्या. त्यांनी मालिकांसोबत सिनेमा आणि वेब सिरीज मधे पण अभिनय केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button