मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल देव कुलकर्णी आणि रुचिर कुलकर्णी यांचा मुलगा म्हणजेच अभिनेता विराजस कुलकर्णी लवकरच लग्नबांधनात अडकणार आहे. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझा होशील ना या मालिकेतून विराजस कुलकर्णीने मालिका सृष्टीत पदार्पण केले होते. या मालिकेत त्याने आदित्य ची भूमिका साकारली होती. विराजस कुलकर्णी अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्या प्रेमात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची खूप छान मैत्री आहे. या मैत्रीला नुकतेच त्यांनी नात्याचे बंधन घातले आहे. शिवाणीने नुकतेच विराजस सोबतचा एक फोटो शेअर करून बोटातली अंगठी दाखवत एंगेजमेंट झाली असल्याचे सांगितले आहे.

‘Put a ring on it २०२२’ असे कॅप्शन देऊन तिने ही बातमी जाहीर केली आहे. विराजस आणि शिवानी हे दोघेही एकमेकांसोबतचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात त्यामुळे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत हे बहुतेकांना परिचयाचे होते. कॉलेजमध्ये असल्यापासूनच या दोघांची ओळख होती. Theatron या नावाने विराजसने संस्था उभारली आहे. या संस्थेतुन नाटक, शॉर्टफिल्म तसेच युट्युब कंटेंट बनवण्यात आले आहेत. शिवानी देखील या संस्थेशी सुरुवातीपासूनच जोडली गेली होती. नुकतेवच या थेटरऑन संस्थेला ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विराजस आणि शिवानी रांगोळे यांनी गोव्यात जाऊन कृजट्रिप एन्जॉय केली होती. त्या ट्रिपचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. शिवाणीने स्टार प्रवाहवरील सांग तू आहेस का या मालिकेत मुख्य भूमिका बजावली होती.आम्ही दोघी, आप्पा आणि बाप्पा, फुंतरु, चिंटू 2 या चित्रपटात आणि मालिकेत ती महत्वाच्या भूमिकेत झळकली होती.

आपली होणारी सून कशी असावी याबाबत मृणाल कुलकर्णी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, माझ्या होणाऱ्या सुनेने तांदूळ निवडून दाखवावेत म्हणजे तिची नजर चांगली आहे की नाही हे मला समजेल… तिने गाऊन दाखवावे म्हणजे तिला बोलता येते की नाही हे मला समजेल …. तसेच तिने चालूनही दाखवावे असे म्हणत स्वतः मृणाल कुलकर्णी यांनी विराजसची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला आणि यातून दोघांच्याही चेहऱ्यावर हास्याचे फवारे उडालेले पाहायला मिळाले होते. मुळात त्यांनी आपल्या होणाऱ्या सुनेबद्दल खूपच साध्या अपेक्षा मांडल्या होत्या…माझ्या मुलाची ती उत्तम मैत्रीण असावी…दोघांनी एकमेकांना कायम साथ द्यावी ..बोलताना त्या म्हणाल्या की, “माझ्या सूनेबद्दल काहीही अपेक्षा नाहीत… विराजसला पूरक अशी, त्याला हवी तशी मैत्रिण त्याला मिळावी आणि ही मैत्रिण आमच्या घरात सून म्हणून यावी, अशी आमची माफक अपेक्षा आहे….आयुष्य त्याचे आहे आणि मुलगी निवडण्याचा अधिकारही सर्वस्वी त्याचा आहे. तो जो काही निर्णय घेईल, त्यात आम्ही आनंदी असू.