माझी तुझी रेशीमगाठ मालिकेला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली. अभनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे ह्यांनी ह्या मालिकेत प्रमुख भुमीका साकारल्यात तर संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी ह्यांच्यामुळे मालिकेला पाहायला आणखीन मजा येते. मालिकेतील छोटी परी सर्वांचेच लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते. आम्ही मालिका फक्त ह्या गोड़ मुलीमुळेच पाहतो असं अनेकांचं मत. मालिकेतील नेहाची मुलगी परी हीच खर नाव “मायरा वायकुळ” असे आहे. तिची निरागसता, बोलण्यातील साधेपणा आणि हसणं, रुसणं पाहायला खूपच मजा येते.

खरंतर मालिकेच्या प्रोमोपासूनच तिला सर्वांची पसंती मिळताना दिसली. पण अनेकांना हे माहित नसेल कि ह्या मालिकेआधी देखील तिचे अनेक चाहते होते. मायरा वायकुळने टिक टॉक सारख्या व्हिडिओजच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. टिक टॉक स्टार म्हणूनही तिची ओळख आहे. इन्स्टाग्रामवरही तिचे खूप फॉलोअर्स आहेत. युट्युबवर Myra’s corner आणि World Of Myra and Family नावाने मायराचे चॅनल देखील पाहायला मिळतात. मायरा आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. मायराचे वडील गौरव वायकुळ आणि आई श्वेता थोरात वायकुळ हे दोघेही मायराला सतत प्रोत्साहन देत असतात. आपल्या मुलीत काहीतरी खास आहे या उद्देशाने त्यांनी सुरुवातीला तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले आणि काही दिवसातच तिला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. छोट्या मुलीचे हे व्हिडिओ चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. काही दिवसांपूर्वी परीचे खरे आई बाबा गौरव वायकुळ आणि आई श्वेता थोरात ह्यांनी केलेले फोटोशूटलाही प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. गेल्याच आठवड्यात मायराच्या आई वडिलांनी “माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेच्या टायटल सॉंगवर अप्रतिम डान्स केला. आई बाबांच्या बाजूला मायराने म्हणजेच आपल्या छोट्या परीनेही डान्स केला. काही दिवसातच ह्या व्हिडिओला चांगलीच प्रसिद्धी मिळालेली आहे. मालिकेत दिसणाऱ्या अभिनेता आणि अभिनेत्री प्रमाणेच त्यांनी डान्स केलेला हा व्हिडिओ तुम्हालाही नक्कीच आवडेल.