मनोरंजन इंडस्ट्रीत एखाद्या कलाकाराच्या यशाचं कौतुक करण्यापेक्षा त्याच्यावर टीका करणं किंवा त्याला ट्रोल करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण यालाही अपवाद असतात. मराठी सिनेमा इंडस्ट्रीत गेल्या काही वर्षात जे विषय हातातळले जात आहे, त्यांची मांडणी केली जात आहे ते पाहता हेवेदावे विसरून मराठी इंडस्ट्रीला मोठं कसं करता येईल याचा विचार करताना दिसत आहे. याचीच प्रचिती चला हवा येऊ दया या शोचा लेखक आणि अभिनेता डॉ. निलेश साबळे याने दिली. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे असतो गृहलक्ष्मीचा हाथ असतो असंदेखील तो म्हणतो.

खरंतर त्याच्या कॉमेडी शोमध्ये तो भल्याभल्यांची फिरकी घेत असतो पण मराठी कलाकार हिंदीच नव्हे तर साऊथमध्येही त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण करत असल्याचा अभिमान निलेशने दाखवून दिला आणि दोन मराठी अभिनेत्यांचे तोंड भरून कौतुकही केले. चार वर्षापूर्वी पडद्यावर आलेल्या बाहुबली या सिनेमाने साउथच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीही गाजवली. बाहुबलीने हिंदी भाषेत जी काही रेकार्ड तोडली त्याला अर्थात दाक्षिणात्य कलाकार आणि टीमचं योगदान होतंच पण दक्षिणेचा हा सिनेमा मराठी प्रेक्षकांपर्यत पोहोचवण्याचं काम हे त्या बाहुबलीच्या आवाजाने केलं. बाहुबली साकारणाऱ्या अभिनेता प्रभास याच्यासाठी हिंदी वर्जनमध्ये मराठमोळा अभिनेता शरद केळकर याने आवाज दिला होता. बाहुबली ही व्यक्तीरेखा जितकी गाजली तितकाच त्याचा आवाजही गाजला. दाक्षिणात्य सिनेमा, हिंदी वर्जन अशी भट्टी जमली असताना तिला यशाची फोडणी देण्यात मराठी अभिनेता शरद केळकर यानेही बाजी मारली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या पुष्पा या सिनेमातील, मै नही झुकेला साला हे वाक्य तुफान गाजलं.

या सिनेमातील प्रत्येक संवाद हिंदी, मराठी भाषिकांपर्यंत भिडला त्याला या सिनेमाची साउथ टीम, नायक अल्लू अर्जुन यांचे कष्ट तर आहेतच पण पुष्पाच्या हिंदी वर्जनमध्ये जो पुष्पाच्या तोंडी जो आवाज ऐकू येतो तो मराठी अभिनेता श्रेयस तळपदे याचा आहे हे एव्हाना प्रत्येकालाच माहीत आहे. या सिनेमात काही मराठी शब्द वापरण्यात आले ते सुद्धा श्रेयसनचे सुचवले होते. पुष्पाची जी काही चर्चा झाली त्यामध्ये श्रेयसच्या आवाजाला विसरून चालणार नाही. श्रेयस तळपदे आणि शरद केळकर या मराठी कलाकारांनी बॉलिवूड आणि साउन सिनेमाइंडस्ट्रीत जे काही योगदान दिले आहे त्यावरूनच निलेश साबळे याने या दोघांवरही कौतुकाचा वर्षाव केला आहे. श्रेयस सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश ही भूमिका साकारत आहेत. शिवाय किक्रेटपटू प्रवीण तांबे यांच्या बायोपिकमध्येही श्रेयसने काम केले. तर शरद केळकर याने तानाजी सिनेमात केलेली शिवाजी महाराजांची भूमिका खूप गाजली.