Barc टीआरपी लिस्ट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे त्यानुसारच मालिकेची लोकप्रियता ठरलेली असते. हिंदी मालिकांप्रमाणे मराठी मालिकांनाही चांगलीच लोकप्रियता मिळालेली दिसते. २० व्या आठवड्यातील हा टीआरपी मालिकेच्या लोकप्रियतेबाबत सध्या बरेच काही सांगून जाताना दिसत आहे. आई कुठे काय करते या मालिकेला बऱ्याच दिवसांपासून चांगली पसंती दर्शवली गेली होती. मात्र गेल्या आठवड्यात मालिकेत घडलेल्या घटना प्रेक्षकांना नाराज करून गेल्या. त्यामुळे आई कुठे काय करते मालिकेच्या लोकप्रियतेत घट झालेली दिसत आहे.

आई कुठे काय करते ही मालिका सध्या टीआरपी च्या बाबतीत ६ व्या स्थानावर जाऊन पोहोचली आहे त्यामुळे मालिकेला चांगलाच दणका बसला आहे. अभि आणि अनघाचा साखरपुडा होणार अशी अपेक्षा असतानाच मालिकेत मोठा ट्विस्ट आला या ट्विस्टला चाहत्यांनी प्रचंड नाराजी दर्शवली होती. म्हणूनच २० व्या आठवड्यात या मालिकेला ६ व्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे. एकीकडे स्टार प्रवाह वाहिनी लोकप्रियता मिळवत आहे मात्र दुसरीकडे झी वाहिनी अजूनही आपला टीआरपी वाढवण्यास सक्षम ठरलेली दिसत नाही. कारण देवमाणूस ही मालिका टीआरपी बाबतीत ८ व्या स्थानावर आहे तर येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेला ९ व्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे. देवमाणूस मालिका निर्णायक वळणावर जरी असली तरी मालिकेच्या टीआरपी मुळे ही मालिका सध्या तरी निरोप घेणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. या मालिकांसोबतच सध्या लोकप्रियतेबाबत अव्वल ठरलेली मालिका आहे ‘फुलाला सुगंध मातीचा’.

तर दुसऱ्या स्थानावर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका लीड घेताना दिसत आहे रंग माझा वेगळा ही मालिका तिसऱ्या स्थानावर असून सांग तू आहेस का आणि स्वाभिमान या मालिकांना अनुक्रमे ४ आणि ५ व्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे. सहकुटुंब सहपरिवार ही मालिका देखील आता ७ व्या स्थानावर असून आपले स्थान ती टीआरपी मध्ये गेल्या काही दिवसांपासून टिकून ठेवताना दिसली आहे. तर सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका सध्या १० व्या स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. झी मराठीच्या केवळ दोनच मालिका टीआरपी बाबतीत पुढे असल्या तरी अव्वल स्थान मात्र स्टार वाहिनीने कायम राखलेले पाहायला मिळत आहे. सध्याच्या कठीण काळात केवळ टीआरपी नाही म्हणून अनेक मालिकांनी निरोप घेतलेला पाहायला मिळतो आहे. कथानक चांगले असूनही केवळ लोकप्रियता न मिळाल्याने मालिका पुढे न करण्याचा निर्णय अनेक आयोजकांनी घेतलेला दिसला.