सिनेसृष्टीमध्ये मोठ मोठ्या दिग्गज कलाकारांप्रमाणेच बाल कलाकार देखील मोठी महत्वाची भूमिका बजावतात. अनेक मालिका आणि चित्रपट या बालकलाकारांमुळे मोठे हिट झाले आहेत. तसेच काही बालकलाकार हे इतके चतुर आणि हुशार असतात की, त्यांच्या हुशारीने ते अनेकांना थक्क करतात. यातीलच एक बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीची बनली आहे. मालिकेतील परी हे पात्र प्रेक्षकांना फार आवडते. मालिकेत परी हे पात्र चिमुकली मायरा साकारत आहे. तर आता मायराने तिच्या आयुष्यात आणखीन एक मोठी झेप घेतली आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे. मयराने आजवर अनेक पुरस्कार जिंकले आहेत. अशात नुकताच या चिमुकलीने आणखीन एका मोठ्या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. हा पुरस्कार अभिनय नाही तर नृत्याशी संबंधित आहे. मायरा उत्तम अभिनय तर करतेच पण त्याचबरोबर ती उत्तम डान्स देखील करते. त्यामुळेच तिला नृत्यकला निकेतन यांच्याकडून एका पुरस्काराने गौरविण्यात आले. जागतिक नृत्यदिनाचे औचित्य साधत तिला दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. तसेच यावेळी इतर मान्यवरांकडून तिला शाल देखील देण्यात आली. नृत्यकला निकेतनच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मयाराच्या पुरस्कार सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. त्यातील एका व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच मायरा ही खूप लहान असून देखील तिला हा पुरस्कार मिळाल्याने तिचे कौतुक होताना दिसत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये मायरा पुढे छोटेसे भाषण करताना देखील दिसत आहे.

यावेळी भाषण करत असताना तिचे आईवडील तिला किती मदत करतात, तिच्या पाठीशी ते कायमचं कसे उभे राहतात या विषयी ती बोलत आहे. मायरा ही फक्त ५ वर्षांची आहे. एवढ्या कमी वयात ती सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच तिचे मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात. ज्यामध्ये तिचं रुसनं, गाणं आणि गोड हासनं अनेकांच्या काळजात घर करतं. सध्या ती ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून रसिक प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. तिला या आधी देखील काही पुरस्कार मिळाले आहेत. ज्यामध्ये झी मराठी पुरस्कार २०२१ उत्तम बालकलाकार या पुरस्काराने तिला सन्मानीत करण्यात आले आहे. तसेच आता पुन्हा एकदा एका पुरस्कारावर तिने आपलं नाव कोरल्याने तिच्या आईवडीलांना तिचा मोठा अभिमान वाटतो.