अजित वाडीकर दिग्दर्शित ‘ वाय’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी, ओमकार गोवर्धन, संदीप पाठक, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, नंदू माधव हे कलाकार चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. २४ जून २०२२ रोजी वाय चित्रपटात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित असल्याने या चित्रपटाची उत्सुकता निर्माण होते. प्राजक्ता माळी ही या चित्रपटाचा महत्वाचा भाग असणार आहे. या चित्रपटानिमित्त प्राजक्ताने मीडियाला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना प्राजक्ताने शूटिंग दरम्यान ब्रेकअप झाल्याचा खुलासा केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून प्राजक्ता माळीचे एका मागून एक येणारे प्रोजेक्ट सुपरहिट ठरलेले पाहायला मिळत आहेत. रानबाजार या सिरीजमधील बोल्ड भूमिकेमुळे प्राजक्ता चर्चेत आली होती. तिला या भूमिकेसाठी ट्रोल देखील करण्यात आले होते. मात्र ह्या विविधांगी भूमिका साकारत असताना ती म्हणते की,’ एक कोणीतरी हिरोईन असं म्हणून मला मारायचं नाहीये अजून खूप काही बाकी आहे. ते सगळे प्रोजेक्ट्स माझ्यापर्यंत यावेत अशी मी देवाकडे प्रार्थना करते. काळानुरूप हे बदल होत आहेत मराठी सृष्टीचं चित्र बदलतंय त्यामुळे ही एक तगडी स्पर्धा आहे सगळ्यांसाठी. वाय चित्रपटात माझा रोल खूप छोटा आहे पण तितकाच महत्वपूर्ण आहे. प्राजक्ता रिलेशनशिपमध्ये होती याचाही तिने धक्कादायक खुलासा केला आहे. चित्रपटाची खास आठवण सांगताना ती पुढे असेही म्हणते की, वाय चित्रपट शूट होत होता त्यावेळेला माझं ब्रेअकप झालं होतं. मी कुठं होते माझं काय चाललंय ह्या गोष्टीसुद्धा मला नीट आठवत नव्हत्या. हा चित्रपट जेव्हा शूट करत होतो तेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक मला आठवण करून देत होते की तू हा सिन करत असताना पडली होती आणि तू ह्या सिनला असं बोलली होती तुला आठवतंय? असे विचारल्यावर मी फक्त हो म्हणत होते.

पण त्यावेळी मी पूर्णपणे ब्लॅंक झाले होते मला ह्या गोष्टी आठवतच नव्हत्या. मी माझ्याच विचारात गुंतलेली होते. प्राजक्ताच्याने केलेल्या या खुलास्यावर तिच्या चाहत्यांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. तू एक गुणी अभिनेत्री आहेस आणि या दुःखातून तू लवकरच बाहेर पडशील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. ब्रेकअपच्या खुलास्या नंतर प्राजक्ता पुढे म्हणते की, माझ्या आयुष्यात ह्या सर्व घडामोडी घडल्यानंतर जेव्हा मी वाय सिनेमा पाहिला त्यावेळेला मी खूपच खुश होते. मी हा चित्रपट निवडून योग्य निर्णय घेतला होता याची मला खात्री झाली. चित्रपटाचा विषय खूपच छान आहे आणि हा चित्रपट पाहून झाल्यावर तुम्हाला तो नक्कीच विचार करायला भाग पाडायला लावणारा आहे. चित्रपटातून इतक्या घडामोडी घडतात याची तुम्ही कल्पना देखील केली नसेल. आपल्या महाराष्ट्रात आपल्या जवळच इतक्या सगळ्या गोष्टी घडतायेत हा प्रेक्षकांसाठी एक मोठा धक्का देणारा आहे .मी या चित्रपटाचा भाग आहे आणि याचा मला आनंद आहे.