Breaking News
Home / जरा हटके / अपघातात गंभीर जखमी झालेल्या अभिनेत्रीने महिन्या भरानंतर मुलीच्या वाढदिवशी लिहली भावनिक पोस्ट

अपघातात गंभीर जखमी झालेल्या अभिनेत्रीने महिन्या भरानंतर मुलीच्या वाढदिवशी लिहली भावनिक पोस्ट

अभिनेत्री वर्षा दांदळे या गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या महिन्यात २२ सप्टेंबर रोजी त्यांचा अपघात झाला होता. त्यामुळे पाठीच्या मणक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. ही बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहोचली आणि त्यांनी या बातमीची दखल घेऊन महापौर किशोरी पेडणेकर यांना वर्षा दांदळे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यास नाशिकला पाठवले होते. अपघात झाल्यानंतर त्यांना कुठलीच हालचाल करणे शक्य नव्हते. आज जवळपास एक महिन्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होताना दिसत आहे.

actress varsha dandale
actress varsha dandale

या कठीण परिस्थितीत त्यांना त्यांची मुलगी तन्मयी ने खूप मोठी साथ दिली होती. आपल्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्या म्हणतात की, “Happy birthday dear daughter Tanmai “, 22 sep ला अपघात झाल्यावर हॉस्पिटल्स, सर्जन्स, सर्जन कडुन होणाऱ्या ऑपेरेशन्स चीं माहिती, आणि ऑपेरेशन झाल्यावर कराव्या लागणाऱ्या physiotherapy चीं सर्व जबाबदारी एकहाती सांभाळणारी माझी लेक आज ek महिन्यानंतर मला आता टाईप ही करता येतंय .. यावरून तिच्यातल्या phisiotherapist चं महत्व लक्षात आले असेलच..Happy birthday Tanu जशी आहेस तशीच रहा सेवाभावी” १९९९ साली वर्षा दांदळे यांनी नाटकाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. अभिनयाचा त्यांचा प्रवास खूपच उल्लेखनीय असाच आहे. प्रेक्षकाना त्यांच्या भूमिका खूप आवडू लागल्या. पुढे झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेली वच्छी अत्याची भूमिका खूपच गाजली होती. याच नावाने त्यांना ओळख देखील मिळाली होती.

varsha dandale daughter tanmai
varsha dandale daughter tanmai

शिवाय वच्छी आत्या लग्न जुळते म्हणून खऱ्या आयुष्यात अनेकांनी त्यांच्याकडे लग्न जुळवून देण्यासाठी पत्रिका आणून दिल्या होत्या. १९९९ साली त्यांनी नाटकाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते २००५ साली वच्छी आत्याच्या भूमिकेने त्यांचे या क्षेत्रात येणे सार्थकी ठरले. पुढे नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेत त्यांनी लता काकूची भूमिका साकारली मग घाडगे आणि सूनमधील सुकन्या कुलकर्णीची मोठी जाऊ आणि मलवणी डेज मधली मालवणी काकू अशा त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना खूपच भावल्या. कृपा-सिंधू या स्वामी समर्थांच्या मालिकेतील सुंदरा बाई या भूमिकेने त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. व्यक्तिरेखा कोणतीही असो वर्षा ताई आपल्या अभिनयाने त्या पात्रात नेहमीच रंग भरताना पाहायला मिळतात. यामुळेच त्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री देखील बनल्या. असो अभिनेत्री वर्षा ताई लवकरात लवकर पूर्णपणे बऱ्या होवोत आणि लवकरात लवकर मालिकांत पाहायला मिळो हीच सदिच्छा ..

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *