Breaking News
Home / जरा हटके / नुकताच साखरपुडा झालेल्या अभिनेत्रीचं केळवण लवकरच करणार लग्न

नुकताच साखरपुडा झालेल्या अभिनेत्रीचं केळवण लवकरच करणार लग्न

महेश कोठारे निर्मित ”दख्खनचा राजा ज्योतिबा” ह्या मालिकेत ‘चोपडाईची’ भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा नुकताच साखरपुडा झाला होता. चोपडाईची भूमिका अभिनेत्री सई कल्याणकर हिने बजावली होती. या मालिके व्यतिरिक्त सईने बऱ्याच मालिकांत आणि चित्रपटात देखील काम केलं आहे. अभिनेता अंकुश चौधरी ह्यांच्यासोबत ती झकास ह्या चित्रपटात झळकली होती. सई कल्याणकर हि एक उत्कृष्ट नृत्यांगना असून भरतनाट्यम विशारद प्राप्त केली आहे. स्टार प्रवाहवरील ”तुझे नि माझे घर श्रीमंताचं” या मालिकेतून तिने महत्वाची भूमिका बजावली होती.

actress sai kalyankar
actress sai kalyankar

काही दिवसांपूर्वी सईने सोशल मीडियावर आपला साखरपुडा झाल्याचे सांगून साखरपुड्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. त्यावरून तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर भरघोस शुभेच्छा पाठवल्या होत्या. नुकतेच सई कल्याणकर आणि तिचा होणारा नवरा प्रशांत शिवराम चव्हाण यांचे केळवण साजरे करण्यात आले आहे. त्यावरून आता हे दोघे लवकरच लग्न करत असल्याचे दिसून येते. सईचा होणारा नवरा प्रशांत चव्हाण हा पेशाने डॉक्टर आहे. डॉ प्रशांत चव्हाण यांनी नॅनो केमिस्ट्री विषयातून पीएचडी केली आहे. अभिनेत्री सई कल्याणकर आणि डॉ प्रशांत चव्हाण यांचं हे अरेंज मॅरेज असणार आहे. साखरपुड्याच्या सोहळ्यात त्यांनी मोजक्याच मित्रमंडळींना आमंत्रित केले होते त्याच अनुषंगाने सई आणि प्रशांतचे लग्न अशाच स्वरूपात करणार असल्याचे सांगितले जाते. लवकरच सईच्या घरी लगीन घाई सुरू झालेली पाहायला मिळणार आहे लग्नाची तारीख अजून त्या दोघांनी देखील जाहीर केली नसली तरी येत्या काही दिवसातच ते दोघे लग्नगाठ बांधणार असल्याचे दिसून येतेय.

actress sai kalyankar and prashant
actress sai kalyankar and prashant

मराठी अभिनेत्री सई कल्याणकर झी युवा वरील फ्रेशर्स या मालिकेत झळकली होती. याच बरोबर कलर्स मराठीवर ”गणपती बाप्पा मोरया” ह्या अध्यात्मिक मालिकेतून तिने सिद्धी ची व्यक्तिरेखा साकारली होती. ”भेटी लागी जिवा” या लोकप्रिय मालिकेतून देखील सईने महत्वाची भूमिका निभावली होती आपल्या सहज सुंदर अभिनयामुळे तिला एका मागून एक मालिका मिळत गेल्या. विशेष म्हणजे हे सगळं चालू असताना देखील अथर्व थिएटरच्या आम्ही पाचपुते ह्या नाटकात देखील ती झळकली. मालिका चित्रपट आणि नाटक ह्या तिन्ही क्षेत्रात सईने आपला जम बसवलेला पाहायला मिळतो. हे सर्व पाहता महेश कोठारेंच्या कोठारे व्हिजनच्या दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत तिला विशाल निकम सोबत मुख्य भूमिका साकारण्यास मिळाली होती. प्रशांत शिवराम चव्हाण आणि मराठी मालिका अभिनेत्री सई कल्याणकर ह्यांना येणाऱ्या लग्नाच्या सोहळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा..

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *