Breaking News
Home / जरा हटके / या मराठी अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी…लवकरच करणार लग्न

या मराठी अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी…लवकरच करणार लग्न

नकुशी या मालिकेतून मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री ‘प्रसिद्धी किशोर आयलवार’ ही लवकरच लग्नबांधनात अडकणार आहे. एक नवी सुरुवात असे म्हणत प्रसिद्धीने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत एक फोटो शेअर करून आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना कळवली आहे. प्रसिद्धी आयलवार ही मूळची नागपूरची सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कुटुंबात तिचा जन्म झाला. तिचे आजोबा गजानन आयलवार हे संगीताचे प्राध्यापक होते. तिचे काका सुधीर आयलवार हे देखील सांस्कृतिक क्षेत्रातील मोठे प्रस्थ होते.

prasidhi ayalwar family photo
prasidhi ayalwar family photo

त्यांनी स्थापन केलेल्या ‘रंगस्वानंद’ या संस्थेतून प्रसिद्धीला अभिनयाचे बाळकडू मिळत गेले. तर तिचे वडील किशोर आयलवार हे देखील रंगकर्मी म्हणून ओळखले जातात. प्रसिद्धीने भरतनाट्यमच्या तीन परीक्षा दिल्या आहेत याशिवाय पुण्यातील ललित कला केंद्र मधून तिने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. ‘ते दोन दिवस’ या चित्रपटातून तिला पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला अंबरनाथ फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. या चित्रपटानंतर उपेंद्र लिमये सोबत नकुशी या मालिकेतून ती मुख्य भूमिका साकारताना दिसली. आम्ही दोघी, लक्ष्मी सदैव मंगलम या आणखी काही मालिकेतून तिने साकारलेल्या भूमिकेचे खूप कौतुकही झाले. आमच्या ‘ही’ चं प्रकरण हे प्रसिद्धीने अभिनित केलेलं पहिलं व्यावसायिक नाटक खूपच गाजलं होतं. देश विदेशात या नाटकाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता.

prasidhi and omkar
prasidhi and omkar

अभिनयाचा वारसा लाभलेल्या प्रसिद्धीने हळूहळू मालिका क्षेत्रात आपला जम बसवला होता. लवकरच प्रसिद्धी किशोर आयलवार ही अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. दुबई स्थित ‘ओंकार वर्तक’ याच्याशी ती लग्नगाठ बांधणार आहे. ओंकार वर्तकने मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले असून सध्या तो दुबईतच कार्यरत आहे. आपल्या लग्नाची तारीख अजून तिने जाहीर केली नसली तरी आयुष्याची नवी सुरुवात असे म्हणताच तिच्या या गोड बातमीने मराठी सेलिब्रिटींकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे. अभिनेत्री प्रसिद्धी किशोर हिला तिच्या आयुष्याच्या नव्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *