आपल्या सहजसुंदर अभिनयाने मराठी सृष्टीतील सोज्वळ नायिका म्हणून मृणाल दुसानिस हिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. माझिया प्रियाला प्रीत कळेना, तू तिथे मी, अस्स सासर सुरेख बाई, हे मन बावरे या मालिकांमधून मृणालने मुख्य भूमिका बजावल्या आहेत. कुठलाही आरडाओरडा न करता, अभिनयाचे आढेवेढे न घेता केवळ चेहऱ्यावरील हावभावावरून अभिनय साकारून या अभिनेत्रीने अनेकांना भुरळ घातली आहे. मृणाल दुसानिस ही मूळची नाशिकची. नाशिक येथेच तिचे पदवीचे शिक्षण झाले आणि पत्रकारितेची पदवी देखील प्राप्त केली. पण अभिनयाची विशेष आवड असल्याने तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि त्यात तिला यश देखील मिळालं.

मालिकांमधून मुख्य भूमिका निभावत असतानाच २५ फेब्रुवारी२०१६ रोजी नीरज मोरे यांच्याशी मृणालचा विवाह झाला. नीरज मोरे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून यूएसमध्ये टेक्सास सिटी येथेच ते कार्यरत आहेत. मृणाल अभिनयासोबतच उत्कृष्ट गायिका देखील आहे. आपल्या लग्नात मृणालने गाणे गायची हौस पूर्ण करून घेतली होती. तिच्या लग्नातला गाणं गातानाचा एक व्हिडीओ यु ट्यूबवर पाहायला मिळेल. लग्नानंतर मृणालचा पती नीरज मोरे यूएसलाच वास्तव्यास असल्याने या कारणास्तव बऱ्याचदा मृणालला मुंबई ते अमेरिका असा प्रवास करावा लागायचा. मालिकेचे शूटिंग आटोपून ती तिच्या नवऱ्याला भेटायला अमेरिकेला जायची. मधल्या काळात अस्स सासर सुरेख बाई या मालिकेतून एक्झिट घेऊन ती अमेरिकेत गेली होती. तर त्यानंतर हे मन बावरे या मालिकेतील लीड रोलमुळे पुन्हा मायदेशी परतली होती. हे मन बावरे या मालिकेने खूप दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला तेव्हा ती पुन्हा अमेरिकेत स्थायिक झाली. अनेकदा ती तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसली.

मात्र आज अचानक मृणालने आई होणार असल्याची एक गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेली पाहायला मिळत आहे. कमिंग सून असे म्हणत तिने चिमुकल्या पावलांचे आगमन होणार असल्याचे सोशल मीडियावर कळवले आहे. ‘ आता स्वतःला वेळ द्यायचा कि स्वच्छ घरात राहायचं याचा आम्ही निर्णय घेतला आहे आणि आमच्या आनंदाचा ठेवा आमच्या वाटेवर आहे…’ असे म्हणत मृणालने आई होणार असल्याची एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या गोड बातमीवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे. सोशिअल मीडियावर तिचे अनेक चाहते तिला आई कधी होणार असा सवाल देखील विचारताना पाहायला मिळत होते तिने दिलेल्या ह्या गोड़ बातमीमुळे चाहते खुश होऊन शुभेच्छांचा वर्षाव करताना पाहायला मिळत आहेत. नीरज मोरे आणि अभिनेत्री मृणाल दुसानिस यांना आयुष्याच्या या नव्या अनुभूतिसाठी मृणाल दुसानिस हिचे खूप खूप अभिनंदन…