मालिका अभिनेत्री केतकी चितळे आपल्या खळबळजनक वक्तव्यामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. मग दिग्दर्शकाने मालिकेतून तडकाफडकी काढणे असो वा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी नावाचा उल्लेख असो वा परिसरातील नागरिकांशी वाद अशा अनेक वादग्रस्त वक्त्यव्यामुळे केतकी चितळेला धारेवर धरण्यात येते. तर अनेकांकडून या कारणास्तव तिच्यावर अनेकांनी शिवी’गाळ देखील केलेली पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी तीने असेच एक वक्त्यव्य केले होते त्या वक्तव्यामुळे केतकी चितळे पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. नुकतेच कोर्टाने केतकी चितळेचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळला आहे. हे प्रकरण नेमके काय आहे ते पाहूयात…

हे प्रकरण गेल्या वर्षीचे आहे मात्र त्यावर कायदेशीर कारवाई चालू असून लवकरच केतकी चितळे हिच्यावर अटकेची टांगती तलवार दिसत आहे. गेल्या वर्षी म्हणजेच १ मार्च २०२० रोजी केतकीने तिच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती त्यात ती म्हणाली होती की, “नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,” अशी वादग्रस्त पोस्ट लिहून तिने शेअर करताच अनेकांनी तिला धारेवर धरले होते. केतकीच्या वक्त्यव्यमुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असे ट्रोलर्सचे म्हणणे होते. ‘ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी ६ डिसेंबर रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत नसून ते केवळ मुंबई दर्शनासाठी येतात … दलित समाज हा फुकटा असून तो महामानवाचा आदर करत नाहीत हे स्पष्ट होत आहे…..’ असेही तिने म्हटले होते.

तिच्या या वक्तव्यानंतर काही जणांनी तिच्या या पोस्टवर आक्षेप घेतला होता. केतकीच्या वादग्रस्त पोस्टमुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत तिच्यावर अट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई केली जावी अशी मागणी जोर धरताना दिसली होती. त्यावरून आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते वकील स्वप्नील जगताप यांनी तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल करताच केतकीविरोधात ठाणे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी नुकताच ठाणे कोर्टाने केतकीचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळला आहे. त्यामुळे केतकी चितळे मोठ्या अडचणीत सापडलेली पाहायला मिळत आहे. लवकरच तिच्यावर कायदेशीर कारवाई अंतर्गत अटक देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेकांकडून या कारणास्तव तिच्यावर सोशिअलमिडीयावर अनेकांनी शिवी’गा’ळ देखील केलेली पाहायला मिळते