रात्रीस खेळ चाले ह्या मालिकेतून अत्यंत लोकप्रिय झालेली शेवंता साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने देखील साताऱ्यात आपल्या नव्या व्यवसायाची सुरवात काही दिवसांपूर्वीच केली होती. अगदी पहिल्या दिवसापासूनच तिच्या व्यवसायाने चांगला जम धरला. शाहूपुरी , सातारा येथे नुकतेच “अपूर्वा कलेक्शन” नावाने साड्या विकण्याचा व्यवसाय तिने सुरू केला होता त्यात तिला चांगलं यश मिळालेलं पाहायला मिळतंय. आपल्या परिसराने जे काही आपल्याला दिले त्याबद्दल आपण त्याला काही देणे लागतो अशी चांगली भावना ठेवत तिने सोशिअल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

सातारा परिसरातील अत्यंत गरीब वयस्कर भीक मागणाऱ्या लोकांची दिवाळी तिने गोड़ केलेली पाहायला मिळते. काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती म्हणते ” समाजातील गरीब आणि दुर्लक्षित भीक मागणाऱ्या वयस्कर, अनाथ अशा लोकांचं पालनपोषण करणं,त्यांना,शासनाकडून जेवण, कपडे, निवास या सुविधा देऊन, त्यांच्या राहणीमानातं सुधारणा करने, वैद्यकीय सेवा देण्याचं कार्य सरकार कडून भिक्षेकरी गृह मार्फत केल जात… मी अपूर्वा कलेक्शनस् या उपक्रमाची सातारा मध्ये नव्याने सुरुवात केली. आपल्या परिसराने जे काही आपल्याला दिले त्याबद्दल आपण त्याला काही देणे लागतो…या दिवाळीत. सातारा येथे असलेल्या पुरुष भिक्षेकरी गृहात जाऊन मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली..आणि त्यांची जीवनक्रिया पाहून मी खुपच भावुक झाले..आपण सर्वजण दिवाळी साजरी करत असताना अशा उपेक्षित लोकांची सेवा करुन त्यांना गोडधोड खायला देऊन, त्यांच्या चेह्यावरच्या आनंदाचं वर्णन करताच येत नाही शासन तर करत असतेच, परंतु समाजातील प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे अशा उपेक्षित लोकांना मदतीचा हात देऊन या लोकांच्या जीवनात आनंद वाढवाला पाहिजे..सर्वे भवन्तु सुखिनः.. ”

इतकच नाही तर तिने एक व्हिडिओ शेअर करत “अंधारात हरवलेल्यांसाठी प्रकाश व्हा” म्हणत गरिबांना जेऊ देखील घातलं आहे. पण ह्या व्हिडिओ मध्ये ती गरिबांना थोडी दूर राहून जेवण वाढताना पाहायला मिळाली ह्यामुळे काही लोकांनी तिला ट्रॉल देखील केलेलं पाहायला मिळालं. खरंतर ह्या महामारीच्या काळाची दाखल घेत तिने थोडं दुरुनच जेवण वाढण्याचं अमूल्य काम करत गरिबांची भूक भागवली आहे. दिवाळीच्या निमित्ताने का होईना ह्या गरीब वयस्कर लोकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटलेलं पाहायला मिळालं. सोशिअल मीडियावर बोलणं किंवा ट्रोल करणं खूप सोपं आहे पण समाजात उतरून त्यांना मदत करण्याचं तिने केलेलं हे काम तितकंच महत्वाचं आहे. असो सातारा येथील शाहूपुरी रोडवर शुक्रवार पेठ येथील सरस्वती कॉम्प्लेक्स मध्ये तिने आपले अपूर्वाज कलेक्शन हे प्रशस्त असे साड्यांचे दुकान थाटले आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…