अभिनेत्री अक्षय देवधर हिची पर्स चोरट्यांनी केली लंपास मैत्रिणीसोबत पुण्यात एका हॉटेलात नाष्टया करतेवेळी

झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या गाजलेल्या मालिकेत अभिनेत्री अक्षया देवधर हिने पाठकबाईंची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे अक्षयाला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. झी मराठीवरील हे तर काहीच नाय या रिऍलिटी शोमध्ये अक्षया देवधर सूत्रसंचालन करताना दिसत आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेनंतर बऱ्याच दिवसांनी ती ह्या शोमधून प्रेक्षकांसमोर आली आहे. मात्र नुकतीच अक्षयाच्या बाबत एक घटना घडली आहे. यात तिला आर्थिक नुकसानही सोसावे लागले आहे. अक्षयासोबत नेमके काय घडले ते जाणून घेऊयात…

काल बुधवारी म्हणजेच २३ फेब्रुवारी रोजी अक्षया देवधर आणि तिची एक खास मैत्रीण पुण्यातील एका हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेले होते. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अक्षया तिच्या मैत्रिणीच्या गाडीवरून फर्ग्युसन रोड परिसरात नाष्टा करायला गेल्या असता आपल्या जवळ असलेली पर्स अक्षयाने गाडीच्या डिक्कीमध्ये असलेल्या एका बॅगेत ठेवली. नाष्टा करून झाल्यावर पुन्हा त्या आपल्या गाडीकडे परतल्या. मात्र गाडीच्या डिक्कीतील वस्तू अस्ताव्यस्त पडल्यामुळे त्या दोघींना थोडासा संशय आला. अक्षयाने डिक्कीमध्ये ठेवलेली पर्स चोरी झाली असल्याचे तिच्या लक्षात आले. अक्षयाच्या पर्समध्ये जवळपास ५ ते ६ हजार रुपयांची रोख रक्कम होती. चोरट्यांनी तिची पर्स लंपास केल्याने अक्षयाला ५ ते ६ हजारांचे नुकसान सोसावे लागले आहे. एका वृत्त वहिनीला अक्षयाने एक मुलाखत दिली आहे त्यात तिने घडलेल्या या घटनेबद्दल खुलासा केला आहे.

अक्षयाने मराठी नाटकापासून सुरवात करत नंतर टीव्ही मालिकांत काम केले. तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे तिला अमाप प्रसिद्धी मिळाली. अनेक स्टेज शो अँकरिंग आणि मालिका यांमध्ये ती पाहायला मिळते. राणा आणि अंजली यांच्या जोडीने जवळपास २ ते ३ वर्ष प्रेक्षकांना अभिनयाची भुरळ घातली. कोल्हापुरात झालेल्या ह्या मालिकेच्या शुटिंगमुळे अनेकांना ती कोल्हापूरची असल्याचं वाटलं पण अक्षया देवधर हि पुण्याची असून मालिकेच्या शुटींग आणि कामानिमित्त ती कोल्हापुरात राहत होती. तिचे कुटूंबीय पुण्यात सदाशिव पेठेजवळ नागनाथ पार येथे स्थायिक आहेत. अक्षया देवधर देखील कामातून वेळ काढून अनेकदा कुटुंबासोबत तेथे पाहायला मिळते. अभिनेत्री अक्षया देवधर हिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…