एखादी नवीन मराठी मालिका जेव्हा सुरू होते तेव्हा प्रेक्षक अगदी आवडीने न चुकता त्या मालिकेचे नवीन नवीन भाग बघण्यास उत्सुक असतात. मराठी मालिका जेव्हा प्रसिद्ध होते तेव्हा लोकप्रियतेचे सर्वच रेकॉर्ड ब्रेक होतात. मराठी मालिका ह्या घराघरात, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच पाहतात. ह्या मालिकांचा खूप मोठा असा चाहतावर्ग हा खूप कमी अशा वेळेत निर्माण होतो. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपल्या जवळचे वाटू लागले आहेत. खूप कमी वेळात ते प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करतात.

जेव्हा या मालिकेमध्ये प्रेक्षकांच्या आवडीची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यातील काही घटना किंवा काही प्रसंग असतील तर त्यांचे चाहते ते जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. अश्या अनेक मालिका सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर सुरु आहेत, आणि अनेक मालिका होऊन देखील गेल्या आहेत. चार दिवस सासूचे, पासून ते आई कुठे काय करते पर्यंत मालिकांचे कथानक भलेही बदलले असतील. मात्र, एक गोष्ट नाही बदलली, आणि ते म्हणजे त्या मालिकांसाठी आणि त्या मालिकांमधील पात्रांसाठी चाहत्यांचे वेड. कोणत्याही मालिकेचा प्रोमो आला कि त्या मालिकेचे कथानक काय आहे, काय वेगळं आहे अशी उत्सुकता निर्माण होते. रसिक प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने २५० भागांचा पल्ला गाठला आहे. मालिकेमधील लतिका आणि अभिमन्युची जोडी बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली आहे. या दोघांच्या सुख – दु:खात, त्यांच्या अडचणीमध्ये प्रेक्षकांनी त्यांची साथ दिली… ते जणू प्रेक्षकांच्या घरातला एक हिस्सा झाले आहेत.

‘सुंदरा मनामध्ये भरली’चा अभिमन्यू अर्थात समीर परांजपे हा विवाहित आहे. त्याच्या पत्नीचे नाव आहे अनुजा. अनुजा ही समीरची मैत्रीण होती. मैत्री प्रेमात बदलली आणि 27 नोव्हेंबर 2016 रोजी समीर व अनुजा लग्नबेडीत अडकले. अनुजा अभिनय क्षेत्रात काम करत नाही. समीर अभिनेता असला तरी अनुजाचा अभिनयाशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. ती पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. अनुजासोबतचे अनेक फोटो अभिमन्यू त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर करत असतो. समीर ला पहिल्यापासूनच नाटक, एकांकिका आणि सांस्कृतिक आवड असल्याने समीर हळूहळू कला क्षेत्राकडे वळला. त्याचा हा प्रवास नक्कीच सोपा न्हवता. समीर एक इंजिनिअर आहे. त्याने त्याच इंजिनिअरिंग पुण्यात पूर्ण केले आहे. मात्र त्याच्यातील कलाकार त्याला शांत बसू देत न्हवता. इंजिनिअरिंग करत असताना देखील अनेक एकांकिका आणि नाटकांमधून त्याच्या आवडीचा प्रवास सुरूच होता. फिरोदिया करंडक स्पर्धेतून समीर च्या अभिनयाची झलक दिसली होती. अगदी सुरुवातीला समीरला राकेश सारंग यांच्या ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेत छोटासा रोल मिळाला होता. ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतील एका छोट्या पात्रापासून समीरच्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती. त्यानंतर गोठ, गर्जा महाराष्ट्र आणि अग्निहोत्र २ या मालिकेत त्यानं नायकाची भूमिका साकारली. भातुकली या चित्रपटातसुद्धा तो प्रमुख भूमिकेत दिसला होता.