
आई कुठे काय करते या मालिकेत कांचनबाई आणि संजनाने पुढाकार घेऊन अरुंधतीला देशमुखांच्या घरावरचा हक्क सोडण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे आता अरुंधती नवीन घर घेण्याच्या तयारीत आहे. एकीकडे अरुंधतीने देशमुखांचे घर सोडले आहे तिथेच अरुंधतीला इतकी वर्षे देशमुख कुटुंबात असताना साथ देणारी विमल आई कुठे काय करते ही मालिका सोडण्याच्या तयारीत असलेली पाहायला मिळत आहे. मालिकेत विमलची भूमिका रंगवली आहे अभिनेत्री सीमा घोगळे यांनी. सीमा घोगळे या आई कुठे काय करते ही मालिका सोडणार असल्याचे बोलले जात आहे. अर्थात या नंतर सीमा घोगळे या सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या ‘ ‘बॉस माझी लाडाची’ या नव्या मालिकेतून महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

येत्या २८ फेब्रुवारी २०२२ पासून रात्री ८.३० वाजता बॉस माझी लाडाची ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘घरात बायकोशी आणि ऑफिसमध्ये बॉसशी पंगा नाही घ्यायचा ‘ असे म्हणत मालिकेचा नायक मिहीर बायकोला पटवण्याचा आणि तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. भाग्यश्री लिमये आणि आयुष संजीव यांनी या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. तर रोहिणी हट्टंगडी बऱ्याच प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा मालिकेतून आज्जीच्या भूमिकेत दिसणार आहेत. शलाका पवार, गिरीश ओक, माधवी जुवेकर ,सोनल पवार असे बरेचसे जाणते कलाकार या मालिकेला साथ देताना दिसणार आहेत. या मालिकेतून सीमा घोगळे यांना देखील महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळत असल्याने त्यांनी आई कुठे काय करते मालिका सोडली असल्याचे म्हटले जात आहे. अर्थात यावर अजून सीमा घोगळे यांनी खुलासा केला नसला तरी त्या आई कुठे काय करते मालिकेशी जोडलेल्या असणार आहेत. थोडक्यात विमलचे पात्र मालिकेतून तुरळक दिसत असल्याने सीमा घोगळे यांनी आणखी एक मालिका स्वीकारली आहे.

आई कुठे काय करते या मालिकेतील अंकिता म्हणजेच अभिनेत्री राधा सागर सध्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेतून ती अभिलाषाचे पात्र निभावताना दिसत आहे. त्यामुळे तिनेही ही मालिका सोडली असल्याचे निश्चित झाले आहे. अनके अभिनेते आणि अभिनेत्री एका मालिकेतून दुसऱ्या मालिकेत जाताना पाहायला मिळतात तर काही कलाकार नाटक तसेच चित्रपटात व्यस्त असल्या कारणामुळे मालिकेतून माघार घेतात अलीकडे अनेक कलाकार ह्या महामारीमुळे फिरायला भेटलं नसल्याने परदेशात जातांनाही पाहायला मिळतात ह्या त्यांच्या बीजी शेड्युलमुळे काही काळासाठी ते मालिकेत पाहायला मिळत नाहीत. तर काही कलाकारांची महामारीच्या आधीची रखडलेली कामे चित्रपट ते पूर्ण करण्यासाठी देखील मालिकेतून बाहेर पडताना पाहायला मिळाली आहेत.