आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक यशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, स्त्रियांबद्दल आदर, प्रशंसा आणि प्रेम दर्शवितो. आज जगभर आंतरराष्ट्रीय महिलादिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय. त्यानिमित्ताने सेलिब्रिटीसुध्दा सोशल मिडीयावर अनेक पोस्ट शेयर करतात. छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते फेम अरुंधती म्हणजेच आई फेम अभिनेत्री मधुराणी गोखले हिने महिला वर्गासाठी एक छानसा संदेश दिला आहे. इन्स्टापेजवर मधुराणी ने हा संवाद साधला आहे. मधुराणीच्या या व्हिडीओची खुप चर्चा रंगली आहे.

मधुराणी सोशल मिडीयावर हा व्हिडीओ पोस्ट करत म्हणते, मैत्रिणींनो, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.आज अरुंधती महाराष्ट्रातल्या असंख्य स्त्रियांसाठी, लेकींसाठी प्रेरणा स्थान झालेय. मला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, वेगवेगळ्या वयोगटातील अनेक स्त्रिया येऊन भेटतात तेव्हा त्या प्रत्येकीला गहिवरून आलेलं मी पाहते. प्रत्येकजण अरुंधतीच्या प्रवासात कुठेतरी स्वतः ला पाहत असते. अरुंधती साकारताना, तिच्या ह्या प्रवासाने मला म्हणजे मधुराणी ला बरंच काही शिकवलंय…. महिला दिनाच्या निमित्ताने अरूंधती आणि मधुराणी यांची सांगड घालताना मधुराणीला वाटतं की या भूमिकेने तिला स्त्रीच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडण्याची संधी दिलीय. ती म्हणते की पंचवीस वर्षे फक्त आणि फक्त गृहिणी म्हणून राहिलेल्या अरुंधती पेक्षा मला आत्ता त्या विरोधात ठामपणे उभी राहणारी आणि स्वतःचा एक जास्त स्वतःचा निर्णय घेणारी अरुंधती मला जास्त महत्त्वाची वाटते. गृहिणीना काहीच काम नसतं या दृष्टिकोनातून नेहमीच पाहिले जात असते परंतु याच मताला छेद देणारी ही मालिका जेव्हा मला करण्याची संधी मिळाली तेव्हा मला मला देखील खूप आनंद झाला खरे तर सध्या माझी मुलगी अशा वयात आहे की तिला आई म्हणून माझी गरज आहे. परंतु या भूमिकेची परंतु या मालिकेची कथा अरुंधती च्या भूमिकेचं महत्त्व हे बघा मला माझा नवरा प्रमोद यांनीही खूप चांगला सपोर्ट केला त्यांनी मुलीला सांभाळण्याचा शब्द दिला आणि म्हणूनच मी मालिकेच्या निमित्ताने मुंबई येथे ते राहू शकत आहे.

अशाप्रकारे घराघरातील महिलांना हवा आहे आणि ही सुरुवात माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये देखील झाली आहे याचं मला फार समाधान नाही वाटतं. मधुराणीसाठी मालिकेतली अरुंधती साकारताना सतत गृहिणी कसा विचार करत असेल, तीच्या घरी सगळय़ांच्या आवडीनिवडी जपण्यासाठी ती कशा पद्धतीने रोज नियोजन करत असेल हा माझ्यासाठी खरेतर एक टास्क होता पण यामध्ये सुद्धा मला एक मजा आली आणि मला स्वतःला हे कळलं की खरंच मी गृहिणी आहे असं सहजपणे सांगणाऱ्या ज्या महिला असतात त्या खरंच खूप मोठं काम करत असतात. व्यवस्थापनाच्यादृष्टीने नियोजनाच्या दृष्टीने असेल त्याही काही सक्षम आहेत. कौतुकास्पद नक्कीच आहे. आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती व्यक्तिरेखेला तिची मुलं आधार द्यायला लागली, सपोर्ट करायला लागली हा विचारही खूप महत्वाचा आहे. मालिका घराघरात पोहोचत असल्यामुळे आपण एखादा चांगला विचार दिला तर तो खरंच परिणामकारक ठरू शकतो हे मालिकेच्या निमित्ताने मी स्वतः अनुभवले आहे.