सिनेसृष्टतील कलाकार त्यांची आलिशान घरे आणि त्यांच्याकडे असलेल्या महागड्या गाड्या या विषयी माहिती ठेवायला प्रत्येक सिनेचाहत्याला आवडते. अशात मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलावंतांकडे कोट्यावधींची किंमत असलेल्या गाड्या आहेत. यात भर म्हणजे नुकतीच अभिनेता स्वप्नील जोशीने देखील नवीन गाडी घेतली आहे. त्याच्या नवीन गाडीची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. स्वप्नीलने जॅग्वार I-Pace लक्झरी इलेक्ट्रिक SUV ही महागडी गाडी खरेदी केली आहे. याची माहिती त्याने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत दिली.

फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्वप्नील त्याच्या कुटुंबीयांसह तो गाडी घेताना दिसत आहे. यावेळी त्याचे आई बाबा, पत्नी लीना आणि गोंडस दोन मुले गाडी खरेदी केल्यामुळे खूप खुश दिसत आहेत. स्वप्नीलने हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “म्हणजे हे आज घडले!!! “पुमा” ची गाडी आली! है ना जगुआर आय-पेस ऑल इलेक्ट्रिक बाप्पा मोरयाआआ.. धन्यवाद #शरद काचलिया जी; मालक नवनीत मोटर्स jaguar India वैयक्तिक बनवल्याबद्दल खूप प्रेम.” जॅग्वार गाडी खरेदी केल्या नंतर सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी आणि काही कलाकारांनी त्याच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला. यामध्ये संदीप पाठक, अमेय वाघ, भरत जाधव, रितेश देशमुख, सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे, अवदुत गुप्ते अशा अनेक कलाकारांनी हार्ट तसेच फायर ईमोजी पाठवत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वप्नीलने घेतलेली जॅगवार I-Pace EV400 इलेक्ट्रिक SUV 90-kWh या गाडीची किंमत तब्बल १.१२ कोटी रुपये एवढी आहे.

तसेच ही गाडी ४.८ सेकंदात ०-१०० किमी प्रति तासाच्या वेगाने धावते. या गाडीचा रंग काळा असून त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मोटर्स देखील बसवलेले आहे. स्वप्नीलच्या अभिनयातील कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास अगदी बालपणापासूनच त्याने अनेक चित्रपटांमध्ये बाल कलाकारांच्या भूमिका साकारल्या आहेत. लहानपणी त्याने साकारलेली कृष्णाची भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे. मितवा, मुंबई पुणे मुंबई, दुनियादारी हे त्याचे काही हिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील यादगार चित्रपटांपैकी आहेत. त्याने बॉलिवूडमध्ये देखील दमदार भूमिका साकारल्यात. अशात गुलाम-ए-मुस्तफा या चित्रपटामध्ये विक्रम दीक्षित हे पात्र खूप सुंदर पने त्याने रेखाटलं होतं. त्याच्या समांतर या वेब सिरीजने देखील अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.