शुक्रवारी गायिका वैशाली भैसने माडे हिने एक फेसबुक पोस्ट करून जीवाला धोका असल्याचा खळबळजनक दावा केला होता . ‘काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. दोन दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. आज मला तुमच्या support ची गरज आहे’. असे म्हणत वैशालीने चाहत्यांची मदत मागितली होती. तिच्या या खुलास्यावर अनेकांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तर हा कुठलातरी पब्लिसिटी स्टंट असावा असा अंदाज अनेकांनी व्यक्त केलेला पाहायला मिळाला.

वैशालीला राजकारणात जायचे असेल म्हणून तिने अशी पोस्ट लिहिली आहे असे मत सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसले त्यावरून अनेकांनी वैशालीला ट्रोल देखील केले. मात्र अशा विरोधी प्रतिक्रिया पाहून वैशाली ने यावर मौन सोडले आहे. मी कुठल्याही प्रकारचा पब्लिसिटी स्टंट करत नाही असा दावा तिने केला आहे. माझ्या जीवाला काही लोकांकडून खरंच धोका असल्याचे ती म्हणते यासंदर्भात तिने पोलीस ठाण्यात जाऊन त्या व्यक्तींविरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. सध्या वैशाली कुठे आहे याचा खुलासा करणे तिने टाळले आहे. जवळपास आठवड्यापूर्वी अंधेरी पोलीस ठाण्यात वैशालीने लेखी तक्रार दाखल केली होती. याची चौकशी चालू असतानाच तिची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वैशालीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. निर्भयाचे एक पथक तिच्या कडे पाठवण्यात आले होते मात्र वैशाली मुंबई बाहेर असल्याचे तिने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळवले आहे. लवकरच ती याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचे तिने कळवले आहे.

राहिला प्रश्न पब्लिसिटी स्टंटचा तर याबाबतही तिने एक खुलासा केला आहे. ‘सर्व प्रिय बंधु भगिनीना जय भिम,जय महाराष्ट्र,जय भारत
बांधवानो काही दिवसापुर्वी पासुन काही लोक द्वेषभावनेने माझ्यावर आन्यायी षडयंत्र चालविण्याचा प्रयत्न करीत आसल्याचे माझ्या लक्षात आल्याने काही लोकांकडुन माझ्या जिवीतास धोका आहे, माझ्या हत्येचा कट रचला जातोय म्हणून आणि याबाबद पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्य स्फोट मी करणार आशी पोष्ट मी टाकुन तुम्हा भावंडाकडे मदतीची मागणी ही केली होती आणि यामुळे आपण सर्वानी तत्परतेने दख्खल घेतल्या बद्दल सगळ्यांचे मनापासून आभार, तुम्हा भावंडाचे माझ्या पाठीशी पाठबळ आसल्याने सगळे घडुन आले आहे. यासंदर्भात आज वौशाली माडे पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत ती नेमका काय खुलासा करणार आहड याकडे लक्ष्य लागून राहिले आहे. शिवाय ज्यांच्यापासून जीवाला धोका आहे त्या व्यक्तींचा ती खुलासा करणार का याचाही लवकरच उलगडा होईल.