Breaking News
Home / अध्यात्म / मागील ११ वर्षांपासून मी हा त्रास सहन करत आहे. माझी यातून सुटका झाल्यास देश सोडून

मागील ११ वर्षांपासून मी हा त्रास सहन करत आहे. माझी यातून सुटका झाल्यास देश सोडून

ज्येष्ठ अभिनेते सुरेश वाडकर ३ ऑगस्ट रोजी मंगळवारी नाशिक येथे लघुपटाच्या प्रदर्शनासाठी गेले होते. नाशिक येथील पोलीस आयुक्तालयात “भूमाफिया” या लघुपटाचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी सुरेश वाडकर, पद्मा वाडकर, नाशिक जिल्ह्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडे, निर्माते योगेश कमोद, दिग्दर्शक समीर रहाणे,पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी गायक सुरेश वाडकर यांनी आपल्या बाबतीत जे घडलं त्यामुळे मी गेल्या ११ वर्षांपासून हा त्रास सहन करत आहे.

suresh wadkar and sonu nigam
suresh wadkar and sonu nigam

पोलीस आयुक्त दीपक पांडे माझी ह्या त्रासापासून मुक्ती करतील …या प्रकरणातून तेच मला न्याय मिळवून देतील असा विश्वास मला वाटतो असे सुरेश वाडकर यांनी म्हटले आहे. हे प्रकरण नेमके काय आहे आणि सुरेश वाडकर असे का म्हणाले ते जाणून घेऊयात… सुरेश वाडकर हे प्रसिद्ध गायक आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांच्याकडे गाणं शिकण्यासाठी दुरदूरवरून अनेक मुलं मुली मुंबईला येत असतात. नाशिक येथिलही बऱ्याच मुलामुलींना त्यांच्याकडे गाणं शिकण्याची ईच्छा असते. त्यामुळे त्यांनी नाशिकला स्वतःची अकॅडमी सुरू करण्याचे ठरवले. याच कारणास्तव त्यांनी त्यांच्या मित्रावर विश्वास ठेवून नाशिक येथे सुरेश वाडकर आणि सोनू निगम दोघांनी मिळून जमीन खरेदी केली होती. मात्र यात त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी हे प्रकरण कोर्टात नेलं. यात बऱ्याच आर्थिक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. सोनू निगमने कंटाळून काढता पाय घेतला. दोघांचीही चांगलीच फसवणूक झाली होती. मध्यंतरी देश सोडून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात आला.

suresh wadkar singer
suresh wadkar singer

मात्र हा सर्व त्रास जेव्हा संपेल त्यानंतर मी याबाबत विचार करेन असे ते यावेळी म्हणाले. या प्रकरणी मित्राकडूनच त्यांची फसवणूक झाल्याने त्यांनी त्या मित्राविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात मोठमोठे अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या देखील मी संपर्कात होतो मात्र त्यांच्याकडून कुठलेच आश्वासन मला मिळाले नाही. कोर्टकचेऱ्या, जमिनीचा वाद यामुळे मानसिक तानही आला. आजही त्यांना या प्रकरणी न्याय मिळाला नसून त्यांची ही लढाई संपलेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र गेल्या वर्षी मी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांनी मला या प्रकरणात न्याय मिळवून देण्याचे आश्वस्त केले आहे. त्यांच्यामुळे माझा ११ वर्षांचा त्रास संपेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही सुरेश वाडकर यांना न्याय मिळवून देऊ…असे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचे म्हणणे आहे. दरम्यान नाशिक शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मोहीम हाती घेतली असल्याचेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *