
काऊंट डाऊन बिगिन्स असे म्हणत गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर यांची लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळत आहे . गेल्या काही महिनाभरापासून मराठी कलाकारांच्या घरी जुईली आणि रोहितचे केळवण साजरे करण्यात येत होते. त्यानंतरही त्यांनी त्यांच्या लग्नाची तारीख गुलदस्त्यात ठेवणे अधिक पसंत केले होते. मात्र साधारण ५ दिवसांपूर्वी जुईलीने आणि रोहितने १० डेज टू गो असे म्हणत लग्न करणार असल्याचे जाहीर केले आहे. हॅशटॅग ‘Rohilee’ चे लग्न असे म्हणत त्यांच्या लग्नसोहळ्याला आता हळूहळू सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे.

आजच जुईलीच्या घरी गृहमख पूजन पार पडले आहे. गृहमख पूजनाचे काही खास फोटो सोशल मीडियावर प्रसिध्द झाले आहेत. त्यामुळे अवघ्या चार दिवसात ते दोघेही मोठ्या थाटात लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. आजच रोहित आणि जुईलीने आपापल्या घरीच हळदीचा सोहळा साजरा केला आहे. त्यानंतर मेहेंदि सोहळा, आणि संगीत सोहळा संपन्न होणार आहे. येत्या काही दिवसातच शासनाने दिलेले सर्व नियम पळून त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे . रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची ओळख झाली ती सारेगमपच्या लिटिल चॅम्प्सच्या मंचावर. या दोघांनीही या रियालिटी शोमध्ये सहभाग दर्शवला होता. जुईली या शोमध्ये फारशी पुढे आली नाही मात्र रोहित राऊत या शोचा रणरअप ठरलेला पाहायला मिळाला. आजही त्याला लिटिल चॅम्प्स म्हणूनच फारसे ओळखले जाते हे विशेष. तेव्हापासून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची ओळख झाली होती. रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यानंतरही अनेक शो मधून एकत्रित कामे करू लागले.

त्यानंतर या ओळखीचे काही वर्षांपूर्वी प्रेमात रूपांतर झाले आणि या दोघांनी रोहितच्या वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियावर एकमेकांच्या प्रेमात असल्याची कबुली दिली. जुईली जोगळेकर हि मूळची पुण्याची पण सध्या ती मुंबईतच वास्तव्यास आहे. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमधून तिने पदवीचे शिक्षण घेतले आहे. सारेगमप सूर नव्या युगाचा या झी मराठीवरील शोमध्ये तिने पार्टीसिपेट केले होते. या शोची ती विजेती देखील ठरली होती. या शोमुळे जुईली प्रसिद्धीच्या झोतात आली. झी युवा वरील संगीत सम्राट सिजन २ या शोमध्ये जुईली कोकण कन्या टीमची कॅप्टन बनली होती. आपल्या टीमला प्रोत्साहन देण्याचे ती काम करत होती. तर रोहितने देखील हिंदी तसेच मराठी रियालिटी शोमधून स्वतःची ओळख निर्माण केली. काही अल्बम आणि चित्रपटातील गाणी देखील त्याने गायली आहेत. त्यामुळे रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर हे नाव प्रेक्षकांना चांगलेच परिचयाचे झाले आहे.