प्रसिद्ध गायिका वैशाली भैसने हिने स्वतःच्या जीवाला धोका असल्याची धक्कादायक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. वैशाली भैसने हिने आपल्याला कोणी जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहे तशा स्वरूपाच्या धमक्या देखील मिळत असल्याचे म्हटले आहे. या सर्व गिष्टींवर मी दोन दिवसांनी पत्रकार परिषद घेणार आहे आणि या घटनेबाबत खुलासा करणार असल्याचे तिने म्हटले आहे. ‘काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय. 2 दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे.आज मला तुमच्या support ची गरज आहे’. सध्या वैशालीने लिहिलेली ही पोस्ट प्रसारमाध्यमातून जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

यामागे नेमके कुठले कारण आहे हे अद्याप तिने सांगितले नसले तरी तिच्या या पोस्टवर मराठी सेलेब्रिटी विश्वातील अनेकांनी सहकार्य दर्शवले आहे. २००९ साली झी टीव्हीवरील सारेगमप या हिंदी शोमध्ये वैशालीने प्रथम क्रमांक पटकावला होता. यात तिला पन्नास लाख रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळाली होती. त्यानंतर वैशालीने अनेक मराठी चित्रपट गीते गायली. सूर नवा ध्यास नवा या सेलिब्रिटी पर्वात तिने सहभाग दर्शवला होता. तर मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनमध्ये तीने पार्टीसिपेट केले होते. काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील किचन कल्लाकार या शोमध्ये देखील ती दाखल झाली होती. वैशाली भैसने हिने सुरेल गाणी गाऊन प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तिच्या या कारकिर्दित तिला झी सिने अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्ड सारख्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मात्र आज अचानक तिची ही जीवाला धोका असल्याचे सांगणारी पोस्ट तिच्या चाहत्यांना धक्का देणारी ठरली आहे. याबाबत अनेकांनी वैशालीला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला आहे. मात्र या विषयावर मी पत्रकार परिषदेत सविस्तर बोलणार आहे असे तिने म्हटले आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे हे पत्रकार परिषदेतच उघड होईल.