Breaking News
Home / जरा हटके / या अभिनेत्रीने “सुंदरा मनामध्ये भरली” मालिका सोडण्याचं धक्कादायक कारण आलं समोर

या अभिनेत्रीने “सुंदरा मनामध्ये भरली” मालिका सोडण्याचं धक्कादायक कारण आलं समोर

“सुंदरा मनामध्ये भरली” मालिकेला आता जवळपास एक वर्ष पूर्ण होऊन गेलं. मालिकेतील कलाकारांच्या अभिनयामुळे मालिका पाहायला वेगळीच मजा येते. त्यामुळे मालिकेला मोठा चाहता वर्ग देखील मिळालेला पाहायला मिळतो. पण काही दिवसांपासून मालिकेतील एका अभिनेत्रींच्या जागी आता नवीन अभिनेत्री पाहायला मिळते. मग जुनी अभिनेत्री कोठे गेली? तिने मालिका का सोडली? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना लागून होते. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत “हेमा जहागिरदार” हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीच नाव प्रमिती प्रीत असे आहे. एका पोस्टद्वारे तिने मालिका सोडल्याच धक्कादायक कारण सांगितलं आहे.

sundara manamadhe bharli actress
sundara manamadhe bharli actress

अभिनेत्री प्रमिती प्रीत हि “सुंदरा मनामध्ये भरली” या मालिकेत येण्यापूर्वी “तू माझा सांगाती” आणि “गर्जा महाराष्ट्र” या मालिकांत पाहायला मिळाली होती. तिने एका मराठी चित्रपटात काम देखील केले आहे. “तू माझा सांगाती” मालिकेत तुकाराम महाराजांची पत्नी आवलीची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. “सुंदरा मनामध्ये भरली” या मालिकेतून ती काही दिवसापासून न दिसण्याचं कारण तिने सांगितलं आहे ती म्हणते “माझे आयुष्य काल वेगळे होते, आणि आज ते खूप वेगळे आहे. मी आता माझ्या जवळच्या प्रकल्पाचा भाग नाही, SMB. हे लिहिताना मला सर्व अश्रू अनावर झाले आहेत. पण शो पुढे गेलाच पाहिजे. मी त्यात आहे किंवा नाही हे माझे हृदय सुंदरासोबत नेहमीच असेल. सुंदर मनमाधे भरली सोबतचे हे वर्ष एक अद्भुत प्रवास आहे. मला त्यातील प्रत्येक सेकंदावर प्रेम होते. सर्वांचे खूप आभार. मी आता माझ्या आरोग्यास सामोरे जाण्यासाठी थोडा वेळ घेईन. आपण हेमाला दिलेल्या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करते.” बऱ्याच दिवसापासून तिच्या चेहऱ्यावर इन्फेक्शन होत असल्याचं दिसून आलं मालिकेत मेकअप केल्याने ते इन्फेक्शन आणखीनच वाढत आहे. या कारणामुळेच ती हि मालिका सोडत असल्याचं बोललं जातेय. मेकअपमुळे अनेक अभिनेत्रींना अश्या चेहऱ्यावरील इन्फेक्शन्सना सामोरे जाताना पाहिलं जात. अभिनेत्री प्रमिती प्रीत हि लवकरच बरी व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना. ती एका उत्तम अभिनेत्री आहे आणि लवकरच ती पुन्हा पाहायला मिळेल अशी आशा आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *