टीआरपीच्या स्पर्धेत या मालिकेने मारली बाजी आम्ही परत नं १ वर आलो म्हणत कलाकारांनी केला जल्लोष

मालिकांचा टीआरपी हा सर्वस्वी प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादावरच अवलंबून असतो. ज्या मालिकेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो त्या मालिका टीआरपीच्या स्पर्धेत आपले स्थान टिकवून ठेवताना दिसतात. गेल्या काही वर्षांपूर्वी झी मराठी वाहिनीवरील मालिका याबाबतीत अव्वल ठरलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे स्थान आता स्टार प्रवाह वाहिनीने निश्चित केलेले पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच मालिका टीआरपीच्या स्पर्धेत टॉप दहा च्या यादीत नाव कमावताना दिसत आहेत. ह्या आठवड्यात सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने अव्वल स्थान पटकावलेले पाहायला मिळत आहे.

त्यामुळे मालिकेच्या कलाकारांनी सेटवरच जल्लोष केला आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या ह्या आठवड्यात अम्मा एक खुलासा करताना दिसणार आहेत. गौरी ही त्यांची मुलगी नसून ती माई आणि दादांचीच मुलगी आहे तर जयदीप हा सुर्यादादांचा मुलगा आहे हे त्या आता उघड करताना दिसत आहेत. या धक्कादायक ट्विस्टमुळे मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आई कुठे काय करते या मालिकेने टीआरपीमध्ये अव्वल स्थान पटकावले होते मात्र मालिकेतून अरुंधती काही काळासाठी गायब झाली होती. अर्थात मधुराणी प्रभुळकरने काही खाजगी करणास्तव या मालिकेतून ब्रेक घेतला होता त्यामुळे अनिरुद्ध आणि संजनावर फोकस करण्यात आला होता. मात्र नुकतेच मधुराणीने सेटवर हजेरी लावून शूटिंगला सुरुवात केली आहे. तिच्या नसण्याने या मालिकेचा ट्रॅक थोडासा बाजूला गेला असल्याने प्रेक्षकांनी देखील नाराजी दर्शवली होती. त्यामुळे आता सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका पहिल्या क्रमांकावर बाजी मारताना पाहायला मिळाली. काही महिन्यांपूर्वी या मालिकेने हाच अनुभव घेतला असल्याने आता पुन्हा एकदा सेटवर जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे.

आम्ही परत नं १ वर आलो असे म्हणत मालिकेच्या कलाकारांनी सेटवरच हा आनंद साजरा केला. कलाकारांसोबत या मालिकेचे निर्माते अर्थात महेश कोठारेंनी देखील आपला आनंद व्यक्त केला आहे. खरंतर झी वाहिनीच्या माझी तुझी रेशीमगाठ आणि तू तेंव्हा तशी ह्या मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत पण गेल्या काही भागांपासून त्या मालिकांना पाहिजे तास यश मिळवता आलं नाही. चला हवा येउ द्या ह्या शोला देखील अनेक दिवसांपासून पूर्वी सारखा टीआरपी मिळताना पाहायला मिळत आहे. ह्याच कारणामुळे आता पुन्हा एकदा सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका प्रथम स्टॅन पटकावताना पाहायला मिळत आहे. ह्याचा आनंद मालिकेतील कलाकार तसेच पडद्यामागील व्यक्ती देखील आनंद घेताना पाहायला मिळाले. हा क्रम नेहमीच बदलत असतो पण पुन्हा एकदा प्रथम स्टॅन पटकावल्यावर आनंद तर होतोच ना…