देवमाणूस मालिकेत देविसिंगला म्हणजेच डॉक्टर अजित कुमार देव ह्यांची तुरुंगातून निर्दोष मुक्तता झाली आहे. गावकर्यांनी मोठ्या जल्लोषात डॉक्टरची
गावात मिरवणूक काढून जंगी स्वागत केलं. मालिकेत ह्यापूर्वी देखील अनेक मराठी अभिनेत्रींची एन्ट्री झालेली आहे आता नुकतीच ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम ‘वहिनीसाहेब’ अर्थात अभिनेत्री माधुरी पवारची एन्ट्री पाहायला मिळतेय. देवीसिंग गावात येण्याआधी तो ह्या महिलेच्या प्रेमात असतो आणि तिला फसवून तिच्या मेहनतीचे पैसे लंपास करून तो ह्या गावात आल्याचं दाखवलं आहे.

तिचे हे पात्र मालिकेत काय काय नवे वळण घेऊन येणार हे पाहणे आता उत्सुकतेचे वाटणार आहे. कारण हे पात्र डॉक्टरला गोत्यात आणेल असच वाटतंय. मालिकेत येणाऱ्या नवनव्या पात्रांमुळे मालिका पाहण्याची उत्सुकता वाढते रात्रीचा साडेदहाच्या स्लॉट हा थरारक आणि रहस्यमय कथांसाठी दाखवला जातो ह्यात हि मालिका अव्वल स्थानी असल्याचं मानलं जात. झी वाहिनेची अग्गंबाई सूनबाई , कारभारी लयभारी, माझा होशील ना आणि चला हवा येउद्या ह्या मालिकेंचा टीआरपी चांगलाच घसरला आहे. झी वाहिनीवरील सद्याच्या घडीला देवमाणूस हि एकच मालिका टीआरपी मध्ये चांगली झळकत आहे. पण मालिकेला चांगला चाहतावर्ग मिळालेला असल्याने हि मालिका उगीचच ताणल्यासारखी वाटतेय. मालिका कधी निरोप घेणार हे अजूनही निश्चित नाही. मालिकेतील प्रमुख पात्र देवीसिंग साकारणारा अभिनेता किरण गायकवाड आणि डिंपल साकारणारी अभिनेत्री अस्मिता देशमुख ह्यांनी काही दिवसांपूर्वीच सोशिअल मीडियावर लाईव्ह येऊन मालिका इतक्यात संपणार नसल्याचं स्पष्ट केलं होत.

पुढील महिन्यात 16 ऑगस्टपासून ‘ती परत आलीये’ हि झी वाहिनीची नवी मालिका येतेय पण त्यामुळे देवमाणूस हि मालिका निरोप घेणार नसून मालिकेच्या वेळेत बदल होण्याची चर्चा आहे. मालिका गुंडाळायची असती, तर नव्या पात्राची मालिकेत एन्ट्री झाली नसती असं देखील बोललं जातंय. ह्यापूर्वी देखील झी वाहिनीच्या तुझ्यात जीव रंगला आणि माझ्या नवऱ्याची बायको ह्या मालिकांना चांगला चाहता वर्ग मिळाला होता पण मालिका संपायचं नावच घेत नव्हत्या. त्यामुळे चाहते देखील नाराज झाले होते अनेक लोक सोशिअल मीडियावर आपला रोष देखील व्यक्त करताना पाहायला मिळत होते. आता देवमाणूस ह्या मालिकेबाबद देखील असच घडताना पाहायला मिळतंय. मालिका वाढवण्यापेक्षा नवीन चांगल्या मालिका आणल्या तर ते पाहायला लोकांना नक्कीच आवडेल .