Breaking News
Home / जरा हटके / हि मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई बेबी शॉवरचे फोटो होताहेत व्हायरल

हि मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई बेबी शॉवरचे फोटो होताहेत व्हायरल

ह्या वर्षीची दिवाळी अनेक मराठी कलाकारांसाठी त्यांच्या चिमुकल्यांच्या आगमनामुळे खास ठरलेली पाहायला मिळत आहे . यात शशांक केतकर, संकर्षण कऱ्हाडे, उर्मिला निंबाळकर, स्मिता तांबे यांचे नाव आवर्जून घ्याव लागेल. या कलाकारांप्रमाणे आता आणखी एक अभिनेत्री लवकरच आई बनणार आहे. बेबी शॉवरचे फोटो शेअर करून या अभिनेत्रीने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेली पाहायला मिळत आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे अंकिता भगत. नुकतीच अभिनेत्री अंकिता भगत हिने फोटो शेअर करत हि आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

actor vinayak mali and actress ankita bhagat
actor vinayak mali and actress ankita bhagat

अभिनेत्री अंकिता भगत हीने विठू माऊली या लोकप्रिय मालिकेत जानकी देवीची भूमिका साकारली होती. अभिनया शिवाय अंकिता उत्कृष्ट डान्सर आहे जीव फसला ह्यो जाल्यामंदी, आई तुझा डोंगर यासारख्या अनेक व्हिडीओ सॉंग्सच्या माध्यमातून अंकिता प्रेक्षकांसमोर आली होती. झी युवा वरील युवा डांसिंग क्वीन या रिऍलिटी शोमध्ये टॉप 6 फिनालिस्ट मध्ये देखील ती पोहोचली होती. सोशल मीडियावर विनायक माळीच्या शेठ माणूस, माझी बायको या सिरीजमध्ये ती झळकताना दिसली. या सिरीजमध्ये विनायक माळी आणि अंकिताची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकाना देखील खूपच आवडली होती. तिच्या ह्या व्हिडिओना लाखो हिट्स मिळाले होते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अंकिताने गौरव खानकर ह्याच्यासोबत गुपचूप साखरपुडा केला होता तिच्या साखरपुड्याची बातमी मिडियामाध्यमात पसरली होती. त्यानंतर काही महिन्यांनी तिने मोठ्या थाटात लग्न केले होते. अंकिता प्रेग्नन्ट असताना साई स्वर म्युजिक प्रस्तुत ‘आई तुझा डोंगर’ हे गाणं तिने शूट केलं ह्या गाण्यात तिला नृत्य सादर करायचं होतं. पण हवतंस तिला करता आलं नाही.

actress ankita bhagat wedding photos
actress ankita bhagat wedding photos

परंतु डॉक्टरांना विचारूनच आणि स्वतःची व होणाऱ्या बाळाची पूर्ण काळजी घेऊन तिने हे गाणं शूट केलं होतं. प्रेग्नन्ट असतानाही अंकिता ह्या गाण्यात अतिशय उत्साहितपणे डान्स करताना दिसते १ नोव्हेंबर रोजी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे आणि ह्या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे. अंकिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या ह्या गोड बातमीने तिच्या चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तिने साकारलेला कोळी गीतावरील मी डोलकर हा म्युजिक व्हिडीओ खूपच गाजला होता. शिवाय गणपती अधिपती, व्हाट्स ऍप गर्ल हे म्युजिक व्हिडिओमध्ये ती झळकली आहे. लवकरात लवकर बाळाचं संगोपन करत ती अभिनय क्षेत्रातही पाहायला मिळेल अशी आशा बाळगुयात आणि ऍक्टर डान्सर असलेल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री अंकिता भगत हिला तिच्या आयुष्यातील ह्या सुंदर क्षणासाठी खूप खूप शुभेच्छा…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *