विना जगताप ही मराठी, हिंदी मालिका अभिनेत्री आहे. राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतून तिचे मराठी सृष्टीत पाऊल पडले होते. ये रिश्ता क्या केहलाता है या हिंदी मालिकेत देखील ती झळकली होती. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनमध्ये तिने हजेरी लावली होती तेव्हापासून विना जगताप हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. गेल्या काही दिवसांपासून विनाच्या घरी तिच्या बहिणीच्या लग्नाची लगबग सुरू होती. तिच्या बहिणीच्या मेहेंदी आणि हळद या सोहळ्याचे फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केलेले पाहायला मिळाले.

विनाने आपल्या बहिणीच्या लग्नात लाल रंगाचा ड्रेस घेतला होता. त्या फोटोवर एकाने अश्लील कमेंट देखील केल्या होत्या. विनाने या अश्लील कमेंट लपवून हा प्रकार उघडकीस आणला आहे. त्या कमेंट्सचा एक स्क्रीनशॉट शेअर करून विनाने त्या कमेंटला उत्तर दिलेले पाहायला मिळत आहे. जेणेकरून असे प्रकार यापुढे घडले जाऊ नयेत म्हणून ही सक्त ताकीदच तिने दिली आहे. या अश्लील कमेंटवर विना जगताप म्हणते की, ” मुलींवर कोणतीही कमेंट कराल आणि त्याची दखल घेतली जाणार नाही हा गौरसमज तुम्ही काढून टाका. अवघ्या एका तासात सगळी माहिती मिळवली म्हणजे विचार करा…परत असं काही झाल्यास त्याचे खूप वाईट परिणाम होतील. असं वाईट कृत्य करण्यापेक्षा भरपूर शिकून आपल्या आईवडिलांच नाव मोठं कर”. विना जगतापने त्या मुलाचा काही तासातच शोध घेतला आहे. या प्रकरणी विनाला बिग बॉस सिजन 2 चा विजेता शिव ठाकरेने मदत केली होती. शिव ठाकरे आणि त्याच्या काही ओळखीतल्या मित्रांनी त्या मुलाचा काही तासातच शोध घेतला असून त्या मुलाची चौकशी केली आहे.

त्या मुलाने अश्लील कमेंट केल्याबद्दल विनाची माफी देखील मागितली आहे. त्या मुलाचा माफी मागतानाचा एक व्हिडीओ विनाने शेअर केलेला पाहायला मिळतो आहे. यावरून अश्लील कमेंट्स करणारे आता सतर्क होतील आणि यापुढे असले प्रकार घडणार नाहीत अशी अपेक्षा तिने बाळगली आहे. बिग बॉसच्या सिजन 2 चा विजेता शिव ठाकरे हा नेहमीच अनेकांच्या मदतीला धावून जाताना पाहायला मिळतो. बिग बॉसच्या घरात असताना विना जगताप आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांच्याशी त्याचे खूपच छान बॉंडिंग जुळून आले होते. हिना पांचाळ हिला काही दिवसांपूर्वी एका पार्टीत सामील झाल्यामुळे अटक करण्यात आली होती तेव्हाही हा शिव तिच्या मदतीला धावून आला होता. आता देखील विना जगतापची त्याने मोठी मदत केली असल्याचे स्पष्ट दिसत आहे.