सई रानडे ही मराठी तसेच हिंदी मालिका अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. स्पंदन, पकडापकडी यासारखे काही मोजके मराठी चित्रपट तिने अभिनित केले आहेत. दहावीत शिकत असताना तिने भरतनाट्यमचे धडे गिरवले होते यात तिला साधना पुरस्काराने गौरविण्यात आले होते. कॉलेजमध्ये असताना सत्यदेव दुबे यांच्या १५ दिवसाच्या ऍक्टिंग वर्कशॉप प्रवेश घेतला होता. सुरुवातीला मॉडेलिंग क्षेत्रात काम करत असताना तिला मालिकेतून अभिनयाची संधी मिळत गेली. रुंजी, वहिणीसाहेब, कुलवधू, देवयानी यासारख्या मालिकेतून तिने विरोधी भूमिका साकारल्या.

फुलाला सुगंध मातीचा या लोकप्रिय मालिकेत तिला छोटीशी भूमिका मिळाली होती. तारा फ्रॉम सातारा, उडान या हिंदी मसलिकेतून तिला महत्वाच्या भूमिका मिळाल्या. कुलवधू मालिकेत काम करत असताना ती ठाण्याला राहत होती. शेजारीच राहत असलेल्या सलील साने सोबत तिची मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात झाले. सलील हा अभिनेत्री, लेखिका, मुलाखतकार “मेघना मेढेकर- साने” यांचा मुलगा आहे. मेघना साने आज कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर अध्यक्ष म्हणून ठाण्यातील सांस्कृतिक वातावरणात मोलाची भर टाकत आहेत. ‘कोवळी उन्हे’ हा त्यांनी स्वतः लिहिलेला आणि आयोजित केलेला कार्यक्रम खूपच लोकप्रिय झाला होता. या एकाच कार्यक्रमातून लावणी, नाट्यछटा, संवाद, नकला असे विविध साहित्यप्रकार त्या स्वतः सादर करत असत. आजवर त्यांची आठ पुस्तकं प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यांचे पती हेमंत साने हे देखील संगीतकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नावाने युट्युब चॅनल आहे त्यात मेघना आणि हेमंत साने दोघा दाम्पत्याने मिळून विडंबनात्मक गीते सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

मेघना साने यांनी तो मी नव्हेच, लेकुरे उदंड झाली, मिट्टी, लढाई या नाटक आणि चित्रपटातून अभिनय साकारला आहे. ४५ लेखकांनी एकत्र येऊन ‘मधूबन’ हे पुस्तक लिहिले या पुस्तकाच्या संपादिका म्हणून मेघना साने यांनी जबाबदारी सांभाळली होती. मेघना साने यांची धाकटी बहीण शर्मिला मेढेकर- कुलकर्णी या देखील मराठी चित्रपट अभीनेत्री आहेत. हेच माझं माहेर या चित्रपटातील ‘ ये अबोली लाज गाली’…. ‘कळले काही तुला, कळले काही मला..’ ही गाणी त्यांच्यावर चित्रित झाली होती. शर्मिला मेढेकर यांनी निर्माते सतीश कुलकर्णी सोबत विवाह केला. अभिनेत्री सई रानडे आणि तिच्या संपूर्ण कुटुंबियांना आमच्या संपूर्ण टीम कडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..