जरा हटके

या मराठी अभिनेत्रीच प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लवकरच होणार लग्न हळदीचे फोटो होतायेत व्हायरल

लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू या झी मराठी वरील मालिकेतील रील जोडी आता रिअल लाईफमध्ये लवकरच विवाहबंधनात अडकत आहेत. झी मराठी वाहिनीवरील लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू या मालिकेचा स्वतंत्र चाहत्यावर्ग होता. काही काळ या मालिकेने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले होते त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात राहिली आहे. या मालिकेतील काजल आणि मदनची भूमिका साकारणारे कलाकार खऱ्या आयुष्यात लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मदनची भूमिका अभिनेता विजय आंदळकर याने निभावली होती तर काजलची भूमिका अभिनेत्री रुपाली झनकार हिने साकारली होती.

actress rupali zankar and vijay andalkar
actress rupali zankar and vijay andalkar

मालिकेत एकत्रित काम करत असतानाच विजय आणि रुपाली यांच्यात प्रेम जुळून आले होते. २१ एप्रिल २०२१ रोजी या दोघांनी एंगेजमेंट केली होती. त्यानंतर हे दोघे लग्न कधी करणार याची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा आता संपली असून विजय आंदळकर आणि रुपाली झनकार लवकरच लग्नाच्या बेडीत अडकताना दिसणार आहेत. नुकताच त्यांचा हळदीचा समारंभ पार पडला आहे. हळदीचे काही खास फोटो रुपालीने सोशल मीडियावर शेअर करून ही आनंदाची बातमी सांगितली आहे. रुपाली झनकार ही मूळची नाशिकचीच आहे इथेच तिचे शालेय तसेच पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू ही तिने साकारलेली पहिली टीव्ही मालिका होती. तर विजय आंदळकरने स्वराज्यरक्षक संभाजी, वर्तुळ, गोठ, प्रेमा तुझा रंग कसा या मालिका अभिनित केल्या आहेत. मि अँड मिसेस सदाचारी, 702 दीक्षित हे चित्रपट साकारले आहेत त्यामुळे विजयने मराठी चित्रपट सृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

actress rupali zankar wedding
actress rupali zankar wedding

आता लवकरच तो हवाहवाई या आगामी चित्रपट आणि अनुराधा या वेबसिरीजमधुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विजय आंदळकर चा हा दुसरा विवाह आहे. २०१७ साली विजय आंदळकर हा अभिनेत्री पूजा पुरंदरे सोबत विवाहबद्ध झाला होता. मात्र रुपाली सोबत एंगेजमेंट केल्यानंतर त्यांच्यात घटस्फोट झाला असल्याचा खुलासा झाला. खरं तर विजय दुसऱ्यांदा लग्न करणार ही बातमीच प्रेक्षकांना धक्का देणारी होती. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील कामिनी अर्थात मिस नाशिकची भूमिका पूजाने आपल्या अभिनयाने गाजवली आहे या भूमिकेमुळे पूजा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. त्यामुळे तिचा घटस्फोट झाला आहे ही बाब प्रेक्षकांना देखील धक्कादायक होती. असो अभिनेत्री रुपाली झनकार आणि अभिनेता विजय आंदळकर याना ह्या सोहळ्यासाठी आणि जीवनाच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button