जरा हटके

मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्या कुटुंबावर पसरली शोककळा भावनिक पोस्ट शेअर करत म्हणते

स्वराज्य रक्षक संभाजी या लोकप्रिय मालिकेतून महाराणी येसूबाईंची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने साकारली होती. उत्तम अभिनय शैली आणि सोज्वळ चेहरा तसेच महाराणी येसूबाईंचा कणखरपणा आणि निर्भीडपणा तिच्या अभिनयातून तिने सशक्तपणे उमटवला याचमुळे प्राजक्ता गायकवाड हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. नांदा सौख्य भरे, संत तुकाराम आणि आई माझी काळूबाई या मालिकांमधून प्राजक्ता गायकवाड महत्वाच्या भूमिकेत झळकली आहे. नुकतेच प्राजक्ताच्या आजोबांचे निधन झाले असल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यावर भावनिक होऊन तिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

actress prajakta gaikwad
actress prajakta gaikwad

आजोबांच्या आठवणी सांगताना प्राजक्ताला गहिवरून आलं आहे त्यात ती म्हणते की,’आजोबा आता कोण बैलगाडी जुंपणार ? आता कोण माझे लाड करणार ? आता कोण माझ्यासोबत हरिपाठ घेणार ? अभंग म्हणणार ? शिस्तप्रिय पण मनमिळावू स्वभाव सगळ्या गावात रुबाब आणि धाक असायचा, येणाऱ्या प्रत्येकाची चेष्टा मस्करी करून बोलणं तुकारामाची नात म्हणजे आपली येसूबाईंची भूमिका करणारी म्हणून पूर्ण गावात, तालुक्यात चर्चा माझी नात म्हणून अभिमान बाळगणारे शेवटपर्यंत स्वाभिमानानं , ताठ मानेनं जगलात सगळं आयुष्य कष्टानं जगलात. वारकरी संप्रदायात रमणारे, प्रत्येक सप्ताहात वीणा धरणारे, मला लहानपणापासून हरिपाठ , ज्ञानेश्वरी,गाथा आणि संपूर्ण भागवत संप्रदाय शिकवणारे लाडके आजोबा कितीही प्रयत्न केला तरी डोळ्यातील अश्रू काही थांबत नाहीत, पण हे नातं खूप अतूट होतं आणि कायम राहील देवाच्या मनात काय आहे याचा कधीच कोणी अंदाज लावू शकत नाही, रात्री मालिका बघून एकत्र जेवण करून सकाळी आपण मॉर्निंग वॉक ला जाऊ असं म्हणून सोडून गेलात आजोबा मन अगदी सुन्न झालंय परत या आजोबा भावपूर्ण श्रद्धांजली! ‘

prajakta gaikwad actress
prajakta gaikwad actress

आजोबांच्या जाण्याने प्राजक्ता पुरती खचलेली पाहायला मिळत आहे. त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत तिने ही पोस्ट लिहिली आहे. प्राजक्ता मनाने जितकी हळवी आहे तितकीच ती वेळप्रसंगी खंबीर देखील पाहायला मिळाली आहे. मालिकेनिमित्त घोडेस्वारी असो वा तलवारबाजी आणि लाठीकाठी हे खेळ तिने शिकून घेतले होते. आणि ह्या खेळत ती सराईतपणे वावरताना देखील पाहायला मिळाली होती. जेजुरीला जाऊन खंडेरायांची ४२ किलो वजनाची खंडा तलवार प्रजक्ताने तितक्याच सराईतपणे उचलली होती याची चर्चा देखील सोशल मीडियावर पाहायला मिळाली होती. आजोबांच्या निधनामुळे प्राजक्ताला आणि तीच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यास बळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button