फुलपाखरू या मालिकेतील वैदेहीच्या भूमिकेने अभिनेत्री हृता दुर्गुळे हिला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. एक्सप्रेशन क्वीन म्हणूनही तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या झी मराठी वरील मन उडू उडू झालं या मालिकेत ती दिपूची भूमिका निभावत आहे. या मालिकेत काम करत असताना हृताचे नाव मालिकेचा नायक अजिंक्य राऊत सोबत जोडले जात होते मात्र १८ नोव्हेंबर रोजी हृताने प्रतीक शाह सोबतचा एक फोटो शेअर करून त्याच्या प्रेमात असल्याची जाहीर कबुली दिली होती.

हृता प्रतिकच्या प्रेमात असल्याचे समजताच अनेकांनी त्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. साधारण पाच दिवसांपूर्वी हृताचा भाऊ गौरव दुर्गुळे आणि विधी पटेल विवाहबद्ध झाले होते त्यांच्या लग्नात प्रतीक शाह आणि त्याची आई मुग्धा शाह यांनी देखील हजेरी लावली होती. आज हृताचा स्पेशल दिवस आहे. आज शुक्रवार २४ डिसेंबर २०२१ रोजी हृता आणि प्रतिकचा साखरपुडा होत आहे. ह्या निमित्ताने हृताने काल आपल्या हातावर मेहेंदी सजवली होती. साखरपुड्यातला तिचा लूक कसा असेल याची कल्पना तिने अगोदरच दिली होती. मुंबईतील ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये हृता आणि प्रतीक यांचा साखरपुडा संपन्न होत आहे. तिच्या साखरपुड्याला मराठी तसेच हिंदी सेलिब्रिटींना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. हृताचा होणारा नवरा म्हणजेच प्रतीक शाह हा उत्कृष्ट डान्सर आहे त्याने हिंदी मालिका दिग्दर्शीत केल्या आहेत. बेहद २, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदड़ी, इक दिवाना था, मनमोहिनी या गाजलेल्या मालिकांसाठी दिग्दर्शनाचे काम केले आहे.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल प्रतीक हा मराठी चित्रपट मालिका अभिनेत्री तसेच हिंदी मालिका अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. मुग्धा शाह यांनी बे दुणे साडे चार, मिस मॅच, कर्तव्य, माहेर माझं हे पंढरपूर या मराठी चित्रपटात काम केले आहे. पुछो मेरे दिल से, संभव असंभव अशा हिंदी मालिकेतूनही त्यांनी अभिनय साकारला आहे. मराठी चित्रपटातून खाष्ट सासू तर कधी सहाय्यक भूमिका त्यांनी साकारल्या होत्या. पण हिंदी मालिका सृष्टीत त्यांना स्वतःची ओळख निर्माण करता आली आहे. मराठी अभिनेत्री हर्षदा खानविलकर ह्यांनी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिचा नुकताच झाला साखरपुडा झाल्याचं सांगत फोटो देखील शेअर केला आहे. हृता आणि प्रतिक यांच्या साखरपुड्याच्या फोटोवर अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळतोय.