Breaking News
Home / जरा हटके / हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे या व्यक्तीच्या प्रेमात आई देखील आहे मराठी अभिनेत्री

हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे या व्यक्तीच्या प्रेमात आई देखील आहे मराठी अभिनेत्री

मन उडू उडू झालं मालिका फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे हिच्या अभिनयावर अनेकजण फिदा आहेत. त्यामुळे तिला एक्सप्रेशन क्वीन असेही म्हटले जाते. मन उडू उडू झालं या मालिकेत दिपू आणि इंद्राची जुळून येत असलेली प्रेम कहाणी प्रेक्षकाना खूपच भावली आहे मात्र ही प्रेमकहाणी जुळून येत असताना हृता दुर्गुळे हिने खऱ्या आयुष्यात आपल्या बॉयफ्रेंडलाच कबुली दिलेली पाहायला मिळत आहे. हृता दुर्गुळे हिने एक फोटो शेअर केला आहे त्यात तिने दिलेले कॅप्शन साऱ्यांचेच लक्ष्य वेधून घेताना दिसत आहे. हृताच्या या पोस्टवर अभिनेत्री प्रिया बापट हीने कमेंट करत ‘जलवा’ असे म्हटले आहे. तर रसिका सुनीलन हीने देखील हृताने दिलेल्या ह्या बातमीला ‘अभिनंदन’ असे म्हटले आहे.

pratik shah actor with mom
pratik shah actor with mom

सध्या हृताच्या या पोस्टवर कलाकारांपासून ते तिच्या चाहत्यांपर्यंत सर्वांनीच शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे. दरम्यान हृता कोणाला डेट करत आहे हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. हृता ज्या व्यक्तीच्या प्रेमात आहे त्या व्यक्तीचे नाव आहे प्रतीक शाह. प्रतीक शाह उत्कृष्ट डान्सर असून हिंदी मालिका दिग्दर्शक आहे. प्रतीकने काही मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. त्याने बेहद २, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदड़ी, इक दिवाना था , मनमोहिनी या गाजलेल्या मालिकांसाठी काम केले आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल प्रतीक हा मराठी चित्रपट मालिका अभिनेत्री तसेच हिंदी मालिका अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. मुग्धा शाह यांनी बे दुणे साडे चार, मिस मॅच, कर्तव्य, माहेर माझं हे पंढरपूर, पुछो मेरे दिल से, संभव असंभव अशा मालिकेतून चित्रपटातून अभिनय साकारला आहे. हिंदी मालिका सृष्टीत त्यांनी बहुतेकदा नायक नायिकेच्या आईची भूमिका निभावली आहे. तर मराठी चित्रपटात देखील त्यांनी सहाय्यक तसेच विरोधी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे मराठी सृष्टीत देखील मुग्धा शाह यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला दिसून येतो.

pratik and actress hruta photo
pratik and actress hruta photo

हृताने फुलपाखरू या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यामुळे तिचे अनेक चाहते तिला सोशल मीडियावर फॉलो करत आहेत. हृताच्या या गोड बातमीवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे तर तितक्याच शुभेच्छा देखील तिला मिळताना दिसत आहेत. स्वतःला फिट ठेवण्यासाठी हृता गेल्या काही दिवसांपासून मेहनत घेत आहे. मालिकेचे चित्रीकरण सुरू झाल्यापासूनच हृताने डाएट प्लॅन आणि वर्कआउट करण्यास सुरुवात केली होती. अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत तिने घेतलेल्या या मेहनतीमुळे तिच्यात झालेले ट्रान्सफॉर्मेशन सर्वांना दिसून येत आहेत आणि हे बदल नक्कीच आश्चर्यकारक आहेत. मालिकेत जाड दिसणारी दिपू आता एकदम फिट कशी? या प्रश्नाचे उत्तर तिच्या चाहत्यांना आता मिळाले आहे. अर्थात हृताचे चाहते तिच्या अभिनयावर प्रेम करतात त्यामुळे बॉडिशेमिंगमुळे तिला आजवर कोणीही ट्रोल केलं नव्हतं हे विशेष.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published.