अठरा-अठरा तास शूटिंग करणारे , शूटिंगसाठी प्रसंगी घरापासून लांब राहणारे कलाकार सण समारंभसाठी मात्र आवर्जून सुट्टी घेऊन आपल्या कुटुंबात रमत असतात. सोशल मीडियावर आपल्या आवडत्या कलाकारांच्या कलाकारांचे सण उत्सवातील पारंपरिक वेशभूषेतील फोटो पाहणे ही त्यांच्या चाहत्यांसाठी ट्रीट असते. अशीच ट्रीट गुढीपाडव्याच्या निमित्ताने अनेक कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिली आहे. अभिनेत्री दिप्ती केतकर हिने देखील तिच्या कुटुंबीयांसोबत गुढीपाडव्याचे फोटो शेअर केले आहेत. खरंतर दीप्ती केतकर ही फार सोशल मीडियावर तिचे पर्सनल फोटो शेअर करत नाही.

पण गुढीपाडव्या सारख्या पारंपारिक मराठमोळ्या सणाच्या निमित्ताने तिने तिच्या फॅमिली सोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सोशल मीडियामुळे कलाकार त्यांचे पर्सनल लाईफ हे त्यांच्या चाहत्यांसमोर आणत असतात. कलाकार मंडळी सुट्टी घेऊन कुठे फिरायला गेली आहेत ? कुठल्या डेस्टिनेशन वर ते त्यांची सुट्टी एन्जॉय करत आहेत ? त्याचप्रमाणे कलाकारांनी नवं घर बुक केलं. नवीन गाडी घेतली यासारख्या सगळ्याच गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार चाहत्यांना सांगण्यासाठी आतुर असतात. गेल्या काही वर्षात सेलिब्रिटी कलाकारांच्या लग्नाचे सोहळे देखील पर्सनल न राहता त्यांच्या अगदी हळदीपासून ते त्यांच्या हनिमून पर्यंतच्या फोटोपर्यंत सेलिब्रिटी कलाकार चाहत्यांशी कनेक्ट असतात .अर्थात ही गोष्ट चाहत्यांना हवीच असते . पण सोशल मीडियामुळे कलाकार आणि चाहत्यामधला हा दुवा दिवसेंदिवस वाढत आहे. गुढीपाडव्याचे औचित्य साधून अभिनेत्री दिप्ती केतकर हिने तिच्या कुटुंबीयांसोबत शेअर केलेला फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला.

या फोटोमध्ये दिप्ती केतकर साडीमध्ये सजलेली आहे. सोबतच तिने तिच्या घराच्या खिडकीत उभारलेली गुढीदेखील तिच्या चाहत्यांना दिसत आहे . या फोटोमध्ये तिचे पती रोमित केतकर आणि मुलगी ही दिसत आहे. दिप्ती केतकर अभिनयासोबत उत्तम नृत्यांगना आहे. नुकतीच ऑलएअर गेलेली येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेतील तिने केलेली शकू मावशीची भूमिका खूपच गाजली. यापूर्वी तिने अवघाची संसार ,कुंकू, मला सासू हवी, जागो मोहन प्यारे यासारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच अप्सरा आली या डान्स रिऍलिटी शोमध्ये देखील तिचा डान्स अनेकांनी पाहिला आहे.