“सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का” मराठी कलाकारांनी केलेली ही भन्नाट मस्ती तुम्ही पाहिलीत का

माणूस काम करून दमल्यानांतर काहीतरी विरंगुळा शोधतो त्याच प्रमाणे कलाकार मंडळी देखील अभिनय करून झाल्यावर विरंगुळा म्हणून काहींना काही करताना पाहायला मिळतात. असं सासर सुरेख बाई ह्या मालिकेच्या सेटवर देखील कलाकार मंडळींनी एकत्र येऊन “सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का” ह्यावर एक व्हिडिओ बनवत तो चाहत्यांसाठी शेअर केला आहे. ह्या व्हिडिओमध्ये असं सासर सुरेख बाई ह्या मालिकेची अभिनेत्री मृणाल दुसानीस हिच्यावर हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. असं सासर सुरेख बाई ह्या मालिकेतील कलाकारांनी एकत्र येऊन हा गमतीदार व्हिडिओ चाहत्यांशी शेअर केला होता.

“सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का” हि एक सिंगिंग कॉम्पिटिशिअन होती अनेक लोकांनी त्यात सहभागी घेत असे अनेक व्हिडिओ बनवण्यात आले होते. काहींनी ग्रुप बनवून तर काहींनी घरातील व्यक्तींना घेऊन हे गाणं त्यांच्या स्टाईल मध्ये गायलं. काही लोकांनी चक्क तुंबलेल्या गटारात होडी घेऊन त्यावर स्टाईलिश गाणं बनवलं होते. “सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का” असं सुरवातीला मराठीत नंतर हिंदी आणि पुढे बऱ्याच भाषेंत सोनू गाण्यानं सोशिअल मीडियावर धिंगाणा घातला. मराठी अभिनेतेच नाही तर बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी देखील सोनूच्या गाण्यावर ताल धरत व्हिडिओ शेअर केले होते. आता सोनूच्या ह्या गाण्याची क्रेझ जरी कमी झाली असली तरी अधून मधून बरेच लोक आजही सोनूच्या गाण्यावर नवनवीन प्रयोग करून व्हिडिओ शेअर करताना पाहायला मिळतात. असो चला तर पाहुयात मराठी कलाकारांनी “सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का” गाण्यावर काय धम्माल मस्ती केली आहे. शेवटी मृणाल काय म्हणते पहा ते नक्की पहा.