Breaking News
Home / जरा हटके / “आंबेवाले जोशींचा आंबा आला रे” म्हणत या कलाकाराने लावला आंबा स्टॉल अभिनय सोबत करतो हा व्यवसाय

“आंबेवाले जोशींचा आंबा आला रे” म्हणत या कलाकाराने लावला आंबा स्टॉल अभिनय सोबत करतो हा व्यवसाय

मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार अभिनयासोबत त्यांच्या आवडीच्या व्यवसायातही पाऊल टाकत असल्याचे गेल्या काही वर्षात दिसून येत आहे. मनोरंजनक्षेत्रातील चढउतार, एक काम संपल्यानंतर दुसरे काम हातात येण्यामध्ये असणारा अनिश्चित अवधी यामुळे कलाकार नेहमीच दुसरा एखादा पर्याय हातात ठेवत असतात. अर्थात त्यांच्या आवडीच्या अभिनय करिअरला कुठेही धक्का न लावता त्यांचा हा व्यवसाय सुरू राहतो. याच पंक्तीत आता अभिनेता, हार्मोनियम वादक, गायक विघ्नेश जोशी याने रसदार व्यवसाय सुरू केला आहे. आंबेवाले जोशी म्हणत विघ्नेशने आंबा स्टॉल लावला असून सोशलमीडियावरून या व्यवसायाची माहिती शेअर केली आहे.

actor vighnesh joshi
actor vighnesh joshi

त्याच्या या पोस्टला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असून त्याचे मनोरंजनक्षेत्रातील सहकारी कलाकार मित्रांनीही त्याच्या या नव्या व्यवसायाचे कौतुक केले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांनी एका नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने विघ्नेशचे हार्मोनियम वादन ऐकले आणि ते वेडे झाले. त्या नाटकात पणशीकर यांनी विघ्नेशला संधी दिली आणि विघ्नेशचा रंगभूमीवरील कारकीर्दीचा पडदा उघडला. त्यानंतर विघ्नेश नाटक, मालिका सिनेमा या माध्यमातून अभिनय करू लागला. मोरया सिनेमातील त्याची व्यक्तीरेखा गाजली. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतील साधा सरळ जावई त्याने साकारला. सध्या विघ्नेश मुलगी झाली हो या मालिकेतही दिसला. एकीकडे हा अभिनय, निवेदन आणि हार्मोनिय वादनाचा प्रवास सुरू असतानाच दोन वर्षापूर्वी आलेल्या कोरोनासंकटाने मनोरंजनविश्व जिथल्यातिथे थांबले. विघ्नेशने तेव्हा आंबा विक्रीचा विचार केला आणि रत्नागिरीतील हापूस आंब्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी छोटय़ा प्रमाणात असलेल्या या व्यवसायाला यंदा विघ्नेशने मोठे स्वरूप दिले आहे.

actor vighnesh joshi mango business
actor vighnesh joshi mango business

त्यासाठी त्याने सोशलमीडियाचा आधार घेतला असून जोशी आंबेवाले असे नाव देत या व्यवसायात झेप घेतली आहे. अभिनय व इतर कलाव्यतीरिक्त अन्य व्यवसायात असलेले कलाकार आपण नेहमीच पाहतो. यामध्ये शशांक केतकर, प्रिया बेर्डे, यांनी हॉटेल सुरू केले. अभिनेता यशोमान आपटे, खुशबू तावडे यांचे कॅफे आहे. शेवंता फेम अपूर्वा नेमळेकर हिने तिचा ज्वेलरी व्यवसाय वाढवला आहे तर अभिज्ञा भावे आणि तेजस्वीनी पंडित यांचा अभिज्ञा हा डिझायनर साडय़ाचा व्यवसाय आहे. कोरोनासारख्या संकटात हातचे काम थांबल्यानंतर काय अडचणी येतात याचा अनुभव प्रत्येकानेच घेतला आहे. त्यामुळे कलाकारही आता एकाच कामावर अवलंबून न राहता उदयोजक बनत आहेत. विघ्नेश जोशी याने आंबा व्यवसायासाठी रत्नागिरीतील आंबा उत्पादकांच्या माध्यमातून नवे क्षेत्र निवडले आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *