बहुतेक कलाकारांची मुलं त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावताना दिसतात. पण प्रत्येकालाच त्यात म्हणावे तसे यश मिळतेच असे नाही तर पर्यायी मार्ग शोधून हे कलाकार पुढे जाऊन दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही उतरतात. मराठी सृष्टीत तर अशी बरीचशी उदाहरणे सांगता येतील. त्यामुळे नेपोटीजमला कुठेतरी फाटा मिळावा आणि नव्या कलाकारांना देखील संधी मिळावी अशी मागणी सोशल मीडियावर बऱ्याचदा पाहायला मिळते.

अशातच जर एखाद्या कलाकारांच्या मुलीने किंवा मुलाने दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात जाऊन नाव कमावले किंवा आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करून त्यातच आपले करिअर केले तर तिथे कौतुकाचा वर्षाव नक्कीच केलेला पाहायला मिळतो. आज अशाच एका अभिनेत्याच्या लेकीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… फोटोत दिसणारी ही मुलगी मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी आहे हे सांगितल्यावर अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही. ह्या मुलीचे नाव आहे “कुहू भोसले”. कुहू भोसले ही प्रसिद्ध अभिनेते “नागेश भोसले ” यांची कन्या आहे. नागेश भोसले हे मराठी सृष्टीत खलनायक म्हणून जास्त परिचयाचे आहेत. तर गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, पन्हाळा यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. नागेश भोसले यांच्या लेकीने अभिनय क्षेत्रात न येता एका वेगळ्या क्षेत्रात येऊन नाव कमावले आहे. कुहू भोसले एक फिटनेस ट्रेनर, इंटरनॅशनल बिकिनी ऍथलेट, बॉडिबिल्डर म्हणून तिची देशभर ओळख आहे. ब्युटी विथ फिट बॉडी असेही तिच्या बाबतीत म्हटले तर वावगे ठरायला नको.

Buyceps या मुंबई स्थित संस्थेशी ती निगडित असून भारतीय महिलांना या क्षेत्रात प्रोत्साहित करण्याचे काम करत आहे. अनेकदा मुंबईतील कुठल्या जिमच्या उदघाटनाला कुहू भोसलेला आमंत्रित केले जाते. अभिनेते नागेश भोसले यांची पत्नी जॉय भोसले या नाट्य निर्माती म्हणून ओळखल्या जातात. कळत नकळत या नाटकाची निर्मिती त्यांनी केली आहे. शिवाय सामाजिक कार्यात देखील त्या सक्रिय आहेत. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढली होती. नागेश भोसले आणि जॉय भोसले यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कुहू भोसले ही त्यांची थोरली मुलगी. आज अभिनय क्षेत्रात न येता कुहूने आगळ्या वेगळ्या क्षेत्रात येऊन आपले नाव लौकिक केले आहे याबद्दल तिचे आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाचे अभिनंदन…