नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी बा पाटील उर्फ दिनकर बाळू पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी १० जून रोजी ऐन पावसात मानवी साखळीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले होते. जवळपास गेल्या १० वर्षांपासून आगरी समाज ही मागणी करत असून या आंदोलनाला येत्या काही दिवसात तीव्र स्वरूप येईल असाही इशारा या समाजाकडून देण्यात आला आहे. तर दुसरीकडे या विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे असा आग्रह शिवसेना करत आहे. या वादामुळेच नवी मुंबईचे विमानतळ चर्चेत येत आहे येत्या २४ जून रोजी यावर तोडगा न निघाल्यास सिडको भवनाला घेराव करून या आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यात येईल हा ईशारा दिला गेला आहे.

याच अनुषंगाने मराठी अभिनेता “मयुरेश कोटकर” याने शिवसेना नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आक्षे”पार्ह पोस्ट लिहिली होती. त्याच्या त्या पोस्टमुळे ठाण्यातील श्रीनगर पोलिसांकडून मयुरेशला अटक करण्यात आली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांकडून मयुरेश विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर दखल घेत पोलिसांकडून कारवाई करून त्याला ताबडतोब अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी सूनावल्यानंतर आज मयुरेशला जामीन देखील मिळणार असल्याची शक्यता सांगितली जात आहे. मयुरेश कोटकर हा मराठी नाट्य अभिनेता म्हणून ओळखला जातो. शिवाय राजकारण आणि सामाजिक कार्यात देखील तो नेहमीच सहभागी होताना दिसतो. संकटकाळात त्याने अनेक गरजू कलाकारांना धान्याचे वाटप केले होते शिवाय को’वि’ड योद्धा म्हणूनही त्याला ओळखले जाऊ लागले होते. संकटकाळात पडद्यामागच्या कलाकारांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून धोका पत्करून आगरी ऑल इन वन संस्था आणि मित्र परिवार यांनी सलग एक महिना १२५ हुं अधिक पडद्यामागच्या कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते त्यात मयुरेश कोटकरसह प्रथमेश सावंत, मोनिष पावसकर यांनी देखील परिश्रम घेतले होते. मयुरेशने बाजीराव मस्तानी, संगीत संत तुकाराम, नटसम्राट, संगीत सौभद्र या आणि अशा कित्येक नाटकांतून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. “लॉर्ड बुध्दा” हे पहिलं हिंदी नाटक त्याने अभिनित केलं होतं. अनेक हिंदी मराठी भाषिक नाटकाच्या माध्यमातून तो नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आज त्याच्या अटकेमुळे मयुरेश सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. तुर्तास त्याला आज जमीन देखील मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
