एकाच क्षेत्रात काम करत असताना एखाद्या इव्हेंटमध्ये ओळख होते . हाय-हॅलो ने सुरुवात झालेली ही ओळख पुढे जाऊन मैत्री आणि मग प्रेमात आकंठ बुडेपर्यंत रिलेशनशिप मध्ये बदलते. इतर क्षेत्रांच्या तुलनेत मनोरंजन क्षेत्रांमध्ये अशा जोड्या लवकर जमतात कारण या क्षेत्रातले चढ-उतार समजून घेणारी व्यक्ती आपल्याला आयुष्यात असावी असं सेलिब्रिटी कलाकारांना वाटत असतं आणि तो शोध जिथे संपतो ते नातं आयुष्यभर टिकायला मदत होते . अशाच जोड्यांपैकी एक म्हणजे गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर. जानेवारी महिन्यात पुण्यातील ढेपेवाडा या डेस्टिनेशन वर एकमेकांशी लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचे असंख्य चाहते आहेत. अगदी लहान वयात दोघांनीही त्यांच्या गाण्याच्या करियरसाठी घेतलेली मेहनत दोघांच्याही यशाचं रहस्य आहे.

लग्नानंतर जुईलीच्या पहिल्याच वाढदिवशी रोहितने तिच्यासाठी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत दोघांच्या नात्यातला ओलावा अतिशय छानपणे टिपला आहे. गेली दहा वर्षापासून रोहित आणि जुईली एकमेकांना डेट करत होते . दोघांच्याही आयुष्यात आलेल्या बऱ्या-वाईट प्रसंगात एकमेकांना साथ देत आता तेआयुष्याचे जोडीदार बनले आहेत. रोहितने जुईली साठी केलेली पोस्ट ही त्याच्या किती हृदयाच्या आतून आली आहे हे त्याच्या शब्दाशब्दातून जाणवतं. रोहित जितका चांगला गायक आहे तितकाच संवेदनशील व्यक्ती आहे. अतिशय लहान वयात त्याने त्याची आई गमावली त्यामुळे वडिलांनीच त्याला आई आणि वडिलांचे प्रेम दिले. त्यामुळेच आयुष्यातील एखादी महत्त्वाची व्यक्ती गमावल्याची खंत किती खोलवर असू शकते आणि त्यातून आयुष्यातील खरी नाती किती आत्मीयतेने जपायची असतात हे रोहित त्याच्या वेगवेगळ्या पोस्ट मधून किंवा त्याच्या बोलण्यातून नेहमीच त्याच्या चाहत्यांना सांगत असतो . त्यातच त्याच्या आयुष्याची जोडीदार जुईली हिच्याबद्दल बोलताना तिचं कौतुक करण्याबरोबरच तिचे त्याच्या आयुष्यात असलेले स्थान आणि तिच्या विषयीचा आदर देखील त्याने या पोस्टमधून व्यक्त केला आहे . रोहित राऊतने जुईलीसोबतचा फोटो शेअर करत म्हटलं आहे.

“दररोज तू तुझ्या चांगल्या व्यक्तिमत्वामुळे मला आश्चर्यचकित करतच असतेच. दररोज मला तुझं आधिक आधिक चांगल रूप पाहायला मिळतं. म्हणून तुला सर्व चांगल्या गोष्टी मिळू देत. तुला माहिती आहे की मी तुझ्यावर किती प्रेम करतो. शिवाय तुझा आदर देखील करतो. माझ्या आय़ुष्यात तू प्रकाश घेऊन आल्याबद्दल मनापासून आभार! आय लव्ह बायको वाढदिवसाच्या शुभेच्छा…” यानंतर त्याने शेवटी म्हटलं आहे की बाकी गिफ्ट आल्यावर देतो…त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. खूप वर्षाच्या डेटिंग नंतर रोहित आणि जुईलीने लग्नगाठ बांधली आहे. मराठीतील हे कुलेस्ट कपल सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते. रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरची पहिली भेट ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ च्या मंचावर झाली होती. यानंतर मैत्री आणि नंतर डेटिंग आण आता दोघे नवरा बायको आहेत.जुईली नव्या पिढीची गायिका आहे.जुईलीचे सोशल मीडियावर देखील खूप चाहते आहेत. शिवाय तिचं युट्यूब चॅनेल देखील आहे. रोहितचा देखील सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. विशेषकरून त्याची तरूणींमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळते.