पांडू हा चित्रपट त्याच्या कथे प्रमाणेच त्यात असलेल्या गाण्यांमुळे देखील खूप लोकप्रिय ठरला. या चित्रपटात भाऊ कदम आणि कुशल यांच्या जोडीसह चित्रपटातील ‘केळे वाली’ आणि ‘जाणता राजा’ या दोन्ही गाण्यांना रसिक प्रेक्षकांनी डोक्यावरचं घेतलं. अशात आता या चित्रपटातील एक कलाकार विवाह बंधनात अडकली आहे. पांडू चित्रपटात स्वराज्याची मुहूर्तमेढ रचणाऱ्या शिवाजी महाराजांवर ‘जाणता राजा’ हे गाणं आहे. या गाण्याला शिंदे शाहीतील आदर्श शिंदे आणि अबोली गिऱ्हेसह अवदुत गुप्ते यांनी आपला आवाज दिला आहे.

अशात या गाण्याची गायिका अबोली गिऱ्हेने आदित्य कुडतरकर बरोबर २९ जानेवारी रोजी विवाह केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. साल २०२१ मध्ये दोघांनी आपली एंगेजमेंट उरकली होती. एंगेजमेंट नंतर या दोघांचे प्री-वेडिंग शूटचे काही फोटो त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर अपलोड केले होते. मराठमोळ्या पद्धतीने या दोघांचा विवाह पार पडला असून अबोलीने लग्नात हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती, तर आदित्यने क्रीम रंगाचा कुडता परिधान केला होता. दोघेही फोटोंमध्ये खूप आनंदी आणि सुंदर दिसत आहेत. गायिका अबोलीच्या संगीतातील कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास तिने सुरेश वाडकर यांच्या म्युजिक अकॅडमीमधून संगीताचे शिक्षण घेतले आहे. तसेच तिने अनेक मालिकांची शीर्षक गाणी देखील गायली आहेत. यामध्ये झी युवावरील ‘युवा सिंगर एक नंबर’ या शोमध्ये तिने सहभाग घेतला होता. इथूनच अबोली प्रसिद्धीझोतात आली.

तिने कल्याण ज्वेलर्सच्या एका जाहिरातीसाठी देखील गाणं गायलं आहे. तसेच ‘मसुटा’ या चित्रपट गीतासोबतच झी युवावरील सर्व तरुणाईला भुरळ घालणारी ‘फुलपाखर’ या लोकप्रिय मालिकेचे शीर्षक गीत अबोलीने गायले आहे. झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेच्या शीर्षक गीताला देखील तिचाच आवाज आहे. ‘रंगलया’ हे लग्न गीत नुकतेच प्रदर्शित करण्यात आले होते हे गीत अबोली गिऱ्हे आणि अतुल जोशी या दोघांनी गायलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अबोलीचा पती आदित्य हा देखील एक म्युजिशियन आहे. त्याला तबला हे वादन खूप उत्तम प्रकारे वाजवता येते. दोघांचे लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. गायिका अबोली गिऱ्हे आणि आदित्य कुडतरकर या दोघांच्या नवीन जीवनप्रवासाला आमच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा.