
महेश कोठारे यांचे अनेक चित्रपट ९० च्या दशकात सुपरहिट ठरले होते तो काळ मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ होता. महेश कोठारे दिग्दर्शित माझा छकुला हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला होता. माझा छकुला या चित्रपटात अभिनेते आणि डायरेक्टर असेलेले महेश कोठारे यांनी आपल्याच मुलाला म्हणजे आदिनाथ कोठारे याला महत्वाची भूमिका सोपवली होती त्याच्या उत्तम अभिनयाने ह्या चित्रपटाला चार चांद लागले. विशेष म्हणजे महेश कोठारे, विजय चव्हाण आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे त्रिकुट याही चित्रपटातून पाहायला मिळाले. महेश कोठारे यांच्या बहुतेक चित्रपटात या कलाकारांना हमखास संधी दिली जात होती.

परंतु या व्यतिरिक्तही आणखी एक कलाकार त्यांच्या बहुतेक चित्रपटातून पाहायला मिळाला. विशेष म्हणजे या कलाकाराने त्यांच्या चित्रपटातून खलनायकाच्या भूमिका बाजावलेल्या पाहायला मिळाल्या. माझा चाकुला चित्रपटात महत्वाची भूमिका गिधाड व्हिलन साकारणारा कलाकार हा महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटांत पाहायला मिळाला आहे. त्याने ह्या चित्रपटात केलेल्या वेगळ्या गेटअप मुले अनेकांनी त्याला ओळखलं नाही. आज या कलाकाराबद्दल अधिक जाणून घेऊयात.. माझा छकुला या चित्रपटात गिधाडांची भूमिका साकारताना अगदी वेगळा गेटअप केल्याने बहुतेकांना हा कलाकार नक्की आहे तरी कोण असा प्रश्न नक्कीच पडला असेल. पण महेश कोठारे ह्यांच्या अनेक चित्रपटांत नेहमी तेच तेच कलाकार पाहायला मिळतात. माझा चाकूला ह्या चित्रपटही अनेक कलाकार आपल्याला पाहायला मिळाले ज्यांनी ह्यापूर्वी देखील महेश कोठारे ह्यांच्या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, मधू कांबीकर, पूजा पवार, निवेदिता जोशी सराफ ह्याच सोबत आणखीन एक कलाकार आहे तोच हा गिधाड. माझा छकुला चित्रपटात गिधाड खलनायक साकारला होता “बिपीन वर्टी” या कलाकाराने.

अगदी हट्टाकट्टा दिसणारा हा कलाकार वेगळ्या गेटअप मुळे अजिबात ओळखू येत नाही. माझा छकुला चित्रपटाप्रमाणेच त्यांनी झपाटलेला चित्रपटातून कुबड्या खविस देखील निभावला होता. आमच्यासारखे आम्हीच, अशी ही बनवाबनवी, एक गाडी बाकी अनाडी, फेका फेकी, धुमधडाका, गंमत जंमत सारख्या अनेक मराठी चित्रपटातून अभिनय साकारला आहे. फेका फेकी, एक गाडी बाकी अनाडी, डॉक्टर डॉक्टर या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. आज बिपीन वर्टी हयात नसले तरी त्यांनी साकारलेल्या अशा अनेक भूमिका अजरामर झालेल्या पाहायला मिळतात. जोवर ते हयात होते तोवर जवळपास सर्वच चित्रपटांत त्यांनी महेश कोठारेंना साथ दिली होती. धडकेबाज ह्या चित्रपटुन त्याने बेडकी दाखवत लक्ष्याला चाललेला तो सिन आजही आठवतो. तर धूम धडाका मध्ये शेवटी तो व्हिलन बाजून फाईट करताना पाहायला मिळाला. झपाटलेला मध्ये कुबड्या खविस म्हणून तो परिचित आहेच.आणि इकडे गिधाड बनून त्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. यावरून बिपीन वर्टी आणि महेश कोठारे यांची खास मैत्री असलेली पाहायला मिळाली.