मराठी फिल्म डायरेक्टर महेश टिळेकर यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केलेली पोस्ट नेटकाऱ्यानी न वाचताच चुकीचा अर्थ काढल्याने मोठा गोंधळ उडाला पोस्ट न वाचताच कमेंट केल्याने नक्की महेश टिळेकर काय म्हणत आहेत त्याचा उलट अर्थ काढला गेला. झालेल्या प्रकाराबाबद डायरेक्टर महेश टिळेकरने सोशिअल मीडियावर पुन्हा पोस्ट शेअर करत उलगडा गेला आहे. महेश टिळेकर म्हणतात ” मी लिहिलेली पोस्ट नक्की कुणा विषयी आहे हे समजून न घेता काहींनी सणसणीत बातमी देण्यासाठी आपल्या सोयीप्रमाणे आपल्याला पाहिजे तसा अर्थ काढत झुंड सिनेमा विरोधी माझी पोस्ट आहे असा गैरसमज लोकांमध्ये निर्माण करून दिला त्यामुळे काहींना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आणि त्यात भर म्हणून बातमी देणाऱ्यांनी झुंड सिनेमाचे पोस्टर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा फोटो वापरून आपले अती कलाकौशल्य दाखवून दिले ते पाहून काहींनी माझी पोस्ट न वाचताच शिमग्याच्या आधी बोंबा मारायला सुरुवात केली. त्यामुळे शिक्षणाचा अभाव, अर्धवट ज्ञान असणाऱ्यांची संख्या समाजात किती जास्त आहे ते मला समजले. ज्यांनी बातमी देऊन गैरसमज निर्माण केला त्यांना मी माझ्या पद्धतीने आणि त्यांना समजेल अश्या भाषेत जाब विचारल्यावर तात्काळ त्यांनी बातमी मध्ये दुरुस्ती केली आणि केलेली चूक सुधारली. त्याबद्दल त्यांचे आभार महेश टिळेकर…”

गेली अनेक वर्ष मराठी फिल्म डायरेक्टर महेश टिळेकर मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत आहेत. मराठी तारका मधून त्यांनी मराठी अभिनेत्रींना चांगली प्रसिद्धी देखील मिळवून दिली आहे. इतकच नाही तर जुन्या मराठी कलावंतांना आर्थिक मदत देखील त्यांनी केली आहे. नाटक चित्रपट गायक यांच्या सोबत गरजू वृद्ध महिला कलावंत असो वा खानावळ चालवणारी एखादी सामान्य घरातील वृद्ध महिला यांचा आदर करत साडीचोळी देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम ते नेहमीच करताना पाहायला मिळतात. पण गेल्या काही दिवसात त्यांनी शेअर केलेल्या पोस्टचा चुकीचा अर्थ लावल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यावेळी ते नक्की काय म्हणाले होते हेही पाहुयात… “नाटकी कलाकारांची झुंडशाही.. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू स्तुती सुमनांच्या माळा असं म्हणत फक्त आपल्याच so called स्वयंघोषित स्टार कलाकारांची वाहवा, वारेमाप स्तुती करणारे काही ग्रुप,टोळी मराठी चित्रपट सृष्टीतही आहे. अभिनय आणि सिनेमा कोळून पिल्यासारखे फक्त आपल्याच स्टार कलाकारांच्या सिनेमावर भरभरून बोलणारी ही मंडळी नवीन कुणाचा , म्हणजे बाहेरून नवीन आलेला कलाकार असेल, दिग्दर्शक असेल तर त्याच्या सिनेमाकडे ढुंकूनही बघत नाहीत.स्वतः ला स्टार सुपरस्टार समजणारे हे काही ठराविक लोक पृथ्वी जशी शेष नागाच्या डोक्यावर तरलेली आहे तशी मराठी चित्रपटसृष्टी यांच्यामुळे आणि यांच्या चित्रपटांमुळेच तग धरून आहे याची जाणीव बोलताना इतरांना करून देताना स्वतःची अक्कल पाजळत असतात. काही दिवसांपूर्वी याच टोळीतील काही कलाकारांचा एक सिनेमा प्रदर्शित झाला मी थिएटर मध्ये जाऊनच प्रत्येक मराठी सिनेमा पाहत असल्यामुळे तो नवीन प्रदर्शित झालेला सिनेमा पहायला गेलो तर शो कॅन्सल झालेला, दुसऱ्या दिवशी आणखी एका थिएटर वर पोचलो तिथेही तीच अवस्था .

शेवटी भांडून दोन तिकिटं काढून मित्रा बरोबर सिनेमा पाहिला. थिएटर मध्ये एकूण सातजणच होते. पुरस्कार सोहळे, टिव्ही चॅनेलवरील रियालिटी शो मध्ये स्वतः च्या नावाचा स्टार, सुपरस्टार म्हणून गवगवा करणारे आणि कामासाठी भरपूर पैसे घेणारे हे स्टार स्वतः अभिनय केलेल्या सिनेमासाठी प्रेक्षक थिएटर पर्यंत आणण्याचा करिश्मा दाखवू शकत नाही याचे दुःख झाले पण प्रेस,मीडिया समोर बोलताना त्या सिनेमातील आणि सिनेमा पहायला स्टायलिश कपडे घालून आलेले हे ठराविक ग्रुप मधील कलाकार एकमेकांची अशी काही तळी उचलत होते,उदो उदो करीत होते की राजदरबारी असणारे भाट पण कमी पडतील.आमचा चित्रपट मानवी भावनांचे कंगोरे दाखवणारा, संवेदनशील मनाला आर्त साद घालणारा …असे साजूक तुपातील,पुस्तकी शब्द बोलताना वापरून मध्येच त्याला इंग्रजीचा तडका देऊन, मिडीयाला बाईट देताना नाटकी बोलणारे ते काही स्टार पाहिल्यावर हसावं की रडावे असं झालं माझं. आपल्याच ग्रुप,कंपू मधील कलाकार, दिग्दर्शकांच्या सिनेमाचे पोस्टर, ट्रेलर स्वतः च्या इन्स्टा,फेसबुक वर शेअर करणारे हे काही कलाकार एखाद्या नवीन किंवा ग्रुप बाहेरील कलाकार,दिग्दर्शकाचे पोस्टर ट्रेलर शेअर करायला हात आखडता का घेतात? स्वतःचे ग्रुप सोडून बाहेरील कुणाच्या सिनेमावर, अभिनयावर बोलताना तोंड का बंद होतात यांची??? मराठी म्हणून अभिमानानं मराठी भाषा दिनानिमित्त पोस्ट,फोटो टाकणारे, आपापले ग्रुप सोडून इतरांचे मराठी सिनेमे थिएटर मध्ये जाऊन का पाहत नाहीत? का आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट? महेश टिळेकर टीप – वरील माझे मत सरसकट चित्रपट सृष्टीतील सर्वच कलाकारांच्या बाबतीत नाही. महेश टिळेकरांची हि पोस्ट पूर्ण न वाचताच कमेंट केल्यामुळे चुकीचे अर्थ काढले गेले आणि मोठा गोंधळ उडाला.