Breaking News
Home / जरा हटके / मराठी सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार असलेला मयूर वैद्य लवकरच करणार लग्न

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार असलेला मयूर वैद्य लवकरच करणार लग्न

काही क्षेत्र ही पुरुषप्रधान मानली जातात तर काही ठराविक क्षेत्र ही महिलाप्रधान मानली जातात पण महिलाप्रधान क्षेत्रात पुरुषांना आपल्या अंगी असलेली गुणवत्ता सिद्ध करावी लागते. पायात घुंगरू बांधून नृत्यकलेत अलंकार पदवी प्राप्त करून मयूर वैद्य यांनी मराठी सृष्टीत आपलं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नृत्य दिग्दर्शक, परीक्षक म्हणून नाव लौकिक करणाऱ्या मयूर वैद्य हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. मधुरा देशपांडे हिच्यासोबत मयूर वैद्य लवकरच लग्न करणार आहेत. मधुरा देशपांडे या देखील कथक विशारद असून संगीत विषयातून एमए केलं आहे. मयूर वैद्य यांनी झी युवा वरील युवा डान्सिंग क्वीन या रिऍलिटी शोचे परीक्षक म्हणून काम पाहिले होते.

mayur and madhura
mayur and madhura

नृत्य कलेत येण्यासाठी मयूर वैद्य यांच्या आईचा त्यांना भक्कम पाठिंबा होता. आशा जोगळेकर यांच्याकडून त्यांनी नृत्याचे धडे गिरवले आहेत. लहानपणी घरी पाहुणे आले की मयूर त्यांच्यासमोर चित्रपटातल्या गाण्यांवर डान्स करून दाखवत त्यावेळी वडिलांना त्याचा डान्स करणे मुळीच आवडत नसे. त्यामुळे आपला मुलगा नृत्य शिकतोय हे त्यांना कळूच दिले नव्हते. मात्र एक दिवस मयूर घरी पायात घुंगरू बांधून नृत्य करू लागले त्यावेळी वडिलांनी ते पाहिलं आणि भयंकर राग व्यक्त केला. ही बाब जेव्हा आशा जोगळेकर यांना समजली तेव्हा मयुरच्या वडिलांना त्यांनी नृत्य शाळेत बोलवून घेतले. त्यानंतर वडिलांचा राग नुसता शांत झाला नाही तर त्यांनी ह्या कलेला पाठिंबा देखील दिला. मयूर यांनी लोकनृत्य, रशियन बॅले यांचेही शिक्षण घेतले आहे. वेगवेगळ्या नृत्य कार्यशाळेतूनही त्यांनी सहभाग घेतला आहे. ज्येष्ठ नृत्यगुरू पं. बिरजू महाराज यांच्या कार्यक्रमातूनही ते सहभागी झाले आहेत. ‘नटरंगी नार’, ‘इथं हवंय कुणाला प्रेम’, ‘सख्या सजणा’, ‘जादू तेरी नजर’, ‘वन टू का फोर’, ‘दिवसा तू रात्री मी’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘लव्ह स्टोरी’, ‘पुन्हा सही रे सही’ आदी ‘सुयोग’च्या नाटकांसाठी तसेच

mayur vaidya and madhura
mayur vaidya and madhura

‘संभवामी युगे युगे’या महानाटय़ासाठी, काही गुजराथी आणि इंग्रजी रंगभूमीसाठी आणि ‘सावरिया डॉट कॉम’, ‘रणभूमी’, ‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘बाय गो बाय’ आदी चित्रपटांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. एक कोंकणी आणि एक हिंदूी चित्रपटही त्यांच्या नावावर आहे. विविध पुरस्कार सोहळे, कार्यक्रम, दूरचित्रवाहिन्यांवरील जाहिराती, फॅशन शो, खासगी मराठी, गुजराथी आल्बम आणि ‘माझे जीवन गाणे’, ‘शब्द सुरांची नाती’, ‘स्वर संग्राम’ आदी रिअ‍ॅलिटी शो साठीही नृत्य दिग्दर्शक म्हणून आपली मोहर उमटविली आहे. ‘ढोलकीच्या तालावर’, ‘दम दमा दम’, ‘छोटे चॅम्पियन’, ‘एका पेक्षा एक-अप्सरा आली’, ‘एका पेक्षा एक-जोडीचा मामला’ या दूरचित्रवाहिन्यांवरील रिअ‍ॅलीटी शोसाठी परीक्षक म्हणूनही मयूर यांनी काम केले आहे. येत्या काही दिवसातच मयूर वैद्य आणि मधुरा देशपांडे विवाहबंधनात अडकणार आहेत. तयांचया आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा….

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *