अनेक मराठी चित्रपट तसेच मालिकांतून अभिनय साकारणारे कलाकार अभिनया व्यतिरिक्त सहसा काही करताना पाहायला मिळत नाहीत पण ह्याला आता अपवाद ठरत एका मराठी अभिनेत्रीने तिच्या नव्या व्यवसायाला सुरवात केली आहे. बालक पालक या चित्रपटात शाश्वती मुख्य भूमिकेत झळकली होती. सिंधू ह्या मालिकेत देखील तिने उत्कृष्ठ अभिनय साकारला होता. परी, चाहूल या टीव्ही सिरीज तसेच हेडलाईन अशा काही प्रोजेक्टमधून ती या मराठी सृष्टीत तग धरून होती. गेल्या वर्षी १७ डिसेंबर २०२० रोजी शाश्वती फोटोग्राफर आणि इंटेरिअर डिझायनर असलेल्या राजेंद्र करमकर सोबत विवाहबद्ध झाली होती.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री “शाश्वती पिंपळीकर” हिने ‘माझ्याकडे काम नाहीये मला चित्रपट, मालिका, वेबसिरीज अशा कुठल्याही माध्यमातून काम करण्याची इच्छा आहे’ असे म्हणून एक पोस्ट शेअर केली होती. काम मिळवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने हा प्रयत्न करून पाहिला. गेल्यावर्षी शाश्वती पिंपळीकर इंटेरिअर डिझायनर आणि फोटोग्राफर असलेल्या राजेंद्र करमरकर सोबत विवाहबद्ध झाली होती. बालक पालक हा तिने अभिनित केलेला पहिलाच मराठी चित्रपट होता. त्यानंतर शाश्वती बऱ्याच टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली होती. त्यापैकी चाहूल या तिने अभिनित केलेल्या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मालिका, चित्रपट असा तिचा प्रवास सुरु असताना गेल्या वर्षी तिने लग्नही केले. लग्नानंतर ती पती राजेंद्र करमरकरसोबत कोथरूड येथे स्थायिक झाली आहे. हाताला काहीतरी काम असावे या हेतूने शाश्वतीने माझ्याकडे काही काम नाहीये अशी एक पोस्ट शेअर केली होती मात्र तिच्या या पोस्टची तितकीशी दखल घेतली नसल्याचे दिसून येते. कारण शाश्वती आता अभिनय सोडून वेगळ्याच क्षेत्रात आपले करिअर घडवू पाहत आहे. “मुदपाकखाना” या नावाने ती खाद्य पदार्थांचा एक नवा बिजनेस सुरू करत आहे.

कोथरूड परिसरात पार्टी ऑर्डर असो किंवा एखादे घरगुती फंक्शन त्यासाठी तुम्ही शाश्वतीच्या मुदपाकखान्यातून जेवणाची ऑर्डर करू शकता. महाराष्ट्रीयन, पंजाबी तसेच ग्राहकांच्या ऑर्डर नुसार तुम्ही विविध पदार्थ देखील इथून मागवु शकता असे शाश्वतीने आश्वस्त केले आहे. पार्टी ऑर्डर सोबतच येत्या ३१ जुलै पासून दर शनिवार आणि रविवारी एक फिक्स मेन्यू ठेवण्यात येईल असे शाश्वती म्हणते. या कामात तिला तिच्या नवऱ्याची देखील मोठी साथ मिळत आहे. “मुदपाकखाना” या नावातच सर्व काही आले आहे त्यामुळे शाश्वतीचा हा हा व्यवसाय नक्कीच यशस्वी भरारी घेईल याबाबत शंका नाही. अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त बहुतेक कलाकारांनी खानावळ असो किंवा वडा पाव विक्री व्यवसाय असो याचा आसरा घेतलेला पाहायला मिळतो आहे. या यादीत आता अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर हीचेही नाव घेण्यात येईल. व्यवसाय कोणताही असो ग्राहकांना त्यातून पुरेसे समाधान मिळाले की आपला हा बिजनेस उत्तुंग भरारी घेण्यास सक्षम ठरतो. शाश्वती आणि राजेंद्र या दोघांनाही या नव्या व्यवसायानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!!!…