मागील जवळपास दीड वर्षांपासून सर्वच व्यवसाय ठप्प झाली आहेत. लॉक डाऊन नंतर दिलेली शिथिलता हळूहळू व्यावसायिकांना पूर्वपदावर आणत असली तरी अजूनही लोककलावंतांची आणि रंगभूमी कलाकारांची चिंता मिटलेली नाही. रंगभूमीशी निगडित सर्वच कलाकार आणि लोककलावंत आजही आपले काम कधी सुरू होईल याच चिंतेत आहेत. हातावर पोट असल्याने कित्येकांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न तसाच अनुत्तरित आहे. आमचे काम सुरू व्हावे प्रेक्षागृहे पुन्हा प्रेक्षकांनी भरून जावे, तिसरी घंटा पुन्हा कानी पडावी यासाठी सरकारकडे अनेक कलाकारांनी सततचा पाठपुरावा केला.

मात्र अजूनही यावर सरकारने ठोस निर्णय घेतलेला नाही. परंतु प्रेक्षागृहात सध्या चालणाऱ्या राजकारण्यांच्या दौऱ्यावर कोणीच कसे काही बोलत नाही? आमच्या हक्काचे व्यासपीठ जर नेतेमंडळी त्यांच्या प्रचारासाठी वापरत असतील तर आम्ही आता गप्प बसणार नाहीत असा इशारा रंगभूमी कलाकारांनी दिला आहे. कलावंतांचे अस्तित्व टिकवून राहण्यासाठी आता हे कलाकार महाराष्ट्रभर “रंगकर्मी आंदोलन ” करणार आहेत. या आंदोलनाला अभिनेत्री “मेघा घाडगे” हिने पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनाबाबत तिने अधिक काय म्हटले आहे ते तिच्याच पोस्टद्वारे पाहुयात…एक काळ होता, अगदीच तुटपुंज्या पाकिटावर समाधानी होणारे आम्ही…अलीकडे मायबाप रसिक प्रेक्षकांच्या तो टाळ्यांचा आवाज कानी ऐकू येत नाही. अनुभवी मार्गदर्शकाची ती पाठीवरची पडलेली थाप गेला काही काळ हरवून गेली आहे…. तिसरी घंटा ऐकायची आहे .. पण तीच घंटा आज धूळ खात पडली आहे. मायबाप सरकारला एक विनवणी करतो, राजकारण्यांचे कार्यक्रम आमच्या नाट्यगृहात करता…आणि आम्ही कलाकार मात्र आमच्या घरात शिरायचे नाही, हा कोणता कायदा. आम्हाला भीक नको , काम करायचे आहे …

आम्हला आनंद तेंव्हा मिळतो जेंव्हा रसिक प्रेक्षक आमच्या कामाच्या मोबदल्यात टाळ्यांचा वर्षाव करतो. आम्ही सुखी तेंव्हा दिसतो. जेंव्हा आमच्या कामातून प्रभोधन होत,आज या महामारीच्या काळात सगळ्यांना सवलती दिल्यात . गरिबांना जेवण, श्रीमंतांना वर्क फ्रॉम होम, घरकाम करणारे ,माताडी कामगारांना,रिक्षा चालकांना सगळ्यांना एक आई सारखे आपण आपल्या पदराखाली जागा दिली. मग आम्ही काय पाप केलं. या मातीशी आम्ही प्रामाणिक आहोत. या महाराष्ट्राची संस्कृती सातासमुद्रा पलीकडे घेऊन गेलो. तुमच्या ही कामात हक्काने आम्हाला बोलावता. मग तो प्रचारासाठी असो वा सेलिब्रिटी म्हणून…त्या तुझ्याच लेकराला विसरलास . आता तूच आमच्याशी अस वागणार तर आम्ही कोणाकडे पाहायचं. म्हणून तुला आमची आठवण करून देण्यासाठी,आमचं अस्तित्व टिकुन राहावे म्हणून, आम्ही आंदोलन करतो आहे…रंगकर्मीआंदोलन महाराष्ट्र जागर रंगकर्मींचा उदो उदो…