पवित्र रिश्ता मालिका फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे ही विकी जैन सोबत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडेच्या लग्नाची लगबग आणि सोहळे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवताना दिसत आहेत. मेहेंदी, हळद, संगीत तसेच एंगेजमेंट सेरेमनीचे तिचे अनेक व्हिडीओ तिने आणि तिच्या सह कलाकारांनि प्रसिद्ध केले आहेत. विशेष म्हणजे अंकिताच्या लग्नात मराठी अभिनेत्रींची मांदिआळी पाहायला मिळाली. अंकिताच्या लग्नसोहळ्यात सुरुवातीपासूनच अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने हजेरी लावली होती.

तर काल संगीत सोहळ्यात अमृता खनविलकरने विकी आणि अंकिता सोबत विविध गाण्यांवर ठेका धरत नृत्य केले होते. आज १४ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळच्या मुहूर्तावर विकी जैन आणि अंकिता लोखंडे विवाहबद्ध झाली आहेत. त्यावेळी अनेक हिंदी कलाकारांसोबत प्रिया मराठे, प्रार्थना बेहरे, अभिज्ञा भावे या अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. प्रार्थना बेहरे, प्रिया मराठे आणि अंकिता लोखंडे यांनी पवित्र रिश्ता या मालिकेतून एकत्रित काम केले होते त्यामुळे त्यांच्यातली मैत्री आजही तशीच अबाधित असलेली पाहायला मिळत आहे. तर अभिज्ञा भावे ही देखील अंकितासोबत पवित्र रीश्ता २ या मालिकेतून काम करत आहे. त्यामुळे त्यांच्यात जुळून आलेले बॉंडिंग अंकिताच्या लग्नात पाहायला मिळते आहे. विकी जैनने विंटेज कारने धमाकेदार एन्ट्री घेतली होती विकीला पाहून अंकिताच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. लग्नाच्या विधी सुरू होण्याअगोदर अंकिताचा ब्राईडल लूक समोर आला होता त्यावेळी तिच्या चाहत्यांनी तिने परिधान केलेल्या लेहेंग्यात तिचे रूप अधिकच खुलले आहे असे म्हणत कौतुक केले होते.

अंकिता आणि विकी जैन यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अंकिताचा जन्म मराठमोळ्या कुटुंबात झाला. तिचे वडील शशिकांत लोखंडे हे न्यूज रिपोर्टर होते तर आई वंदना फडणीस या शिक्षिका होत्या. इंदोरला त्यांचे कुटुंब वास्तव्यास होते आपले पदवीचे शिक्षण झाल्यानंतर अंकिता मुंबईत दाखल झाली. आयडिया झी सिनेस्टार या शोमध्ये अंकिता सहभागी झाली होती इथूनच तिला पवित्र रिश्ता या मालिकेत अर्चनाची प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या पहिल्याच मालिकेमुळे अंकिता प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आणि खूपच लोकप्रिय झाली. माणिकर्णिका चित्रपटात अंकिता झलकार बाईच्या भूमिकेत पाहायला मिळाली. सुशांतच्या निधनानंतर त्याच्या आठवणीत पवित्र रिश्ता २ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला यावी अशी मागणी प्रेक्षकांनी केली होती त्यानंतर ही मालिका पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आली आहे.