अभिनेता विकास पाटील हा वयाच्या ९ व्या वर्षापासूनच चित्रपटात काम करू लागला हिंदी चित्रपट “हमशक्ल” या चित्रपटात त्याने लहान मुलाचा छोटासा रोल साकारला होता. पण त्यानंतर त्याने अभ्यासात लक्ष देत पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून बीएसए पूर्ण केलं. लहानांपासून आपल्याला अभिनेता बनायचं असं मनापासून वाटतं होत असं तो म्हणतो. सुदैवाने त्याला कॉलेजनंतर लगेच कामे देखील मिळू लागली. चॉकलेट हिरो म्हणून अभिनेता विकास पाटीलने स्वतःची ओळख बनवली. “चाल खेळ खेळूया दोघे” , “मालक”, “असा हा अतरंगी, “तुझ्या वीण मरजावा”, “मराठी टायगर्स” ,”सेंटीमेंटल” अश्या अनेक चित्रपटात कधी हिरो कधी पोलीस कर्मचारी तर कधी निगेटिव्ह भूमिका त्याने साकारली.

छोट्या पडद्यावर देखील त्याने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने केलेल्या मालिकांना देखील प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. चार दिवस सासूचे, कुलवधू, लेक माझी लाडकी, माझिया माहेरा, अंतरपाट, बायको अशी हवी अश्या अनेक मालिका त्याने साकारल्या. बायको अशी हवी ह्या मालिकेनंतर त्याने बिग बॉस मराठी ह्या रिऍलिटी शो मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तिथेदेखील तो उत्तम खेळ खेळताना दिसतो. विशेष म्हणजे ह्या शो मध्ये एकमेकांचे पाय ओढून पुढे जावं लागलं पण विकास सर्वांना मदत करताना पाहायला मिळतो त्यामुळेच तो प्रेक्षकांचा आवडता स्पर्धक देखील बनला आहे. नुकतंच विकासने बिगबॉसच्या घरात आपल्या मुलाबाबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराबाबत खुलासा केला आहे. तो गेल्या काही वर्षांपासून आजाराशी झुंज देत आहे. त्याने हा खुलासा करताच तिथे असलेल्या सदस्यांना देखील आपले अश्रू अनावर झाले होते. विकास पाटीलचा मुलगा मौर्य हा ३ वर्षांचा होता त्यावेळी इतर मुलांसोबत खेळत असताना तो सोसायटीत असलेला एका पाण्याच्या टाकीत पडला. जवळपास ७ ते ८ मिनिटं तो त्या पाण्यातच होता.

त्यानंतर त्याला लगेचच उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. गेल्या ५ वर्षांपासून तो या भयावह घटनेला विसरू शकलेला नाही. विकासाचा मुलगा मौर्य आता ८ वर्षांचा झाला असला तरी ह्या धक्क्यातून तो स्वतःला बाहेर काढू शकलेला नाही. माझा मुलगा अजूनही या घटनेमुळे खूपच घाबरला आहे. या आजारातून तो योग्य उपचार घेऊन बरा होऊ शकतो असे विकास बिग बॉसच्या घरात म्हणाला होता. माझी पत्नी स्वाती पाटील हिने देखील त्यावेळी खूप कष्ट घेतले. तिच्या आणि माझ्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल अशी आशा आहे. आम्ही त्याच्यावर योग्य ते उपचार करतोच आहोत. लवकरच तो बारा देखील होईल अशी आशा आहे. आपल्या मुलाच्या या परिस्थितीमुळे विकास खूप काळजीत वाटला आणि भावून होऊन मुलाच्या आठवणीत रमलेला पाहायला मिळाला होता. ह्यावेळी विकासाची हळवी बाजू देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली.