Breaking News
Home / ठळक बातम्या / साठवलेला पैसा संपलाय आम्हाला धड जगताही येईना आणि मरताही येईना म्हणत जेष्ठ अभिनेत्रीचे डोळे पाणावले

साठवलेला पैसा संपलाय आम्हाला धड जगताही येईना आणि मरताही येईना म्हणत जेष्ठ अभिनेत्रीचे डोळे पाणावले

सिनेमा आणि नाट्यगृहे बंद असल्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावर बोलताना जेष्ठ मराठी अभिनेत्री जयमाला इनामदार ह्यांचे डोळे पाणावले. जयमाला ह्या अभिनेते प्रकाश इनामदार ह्यांच्या पत्नी. अनेक चित्रपट आणि मालिकांत त्या पाहायला मिळतात. त्यांच्या गाढवाचं लग्न ह्या प्रसिद्ध नाटकाचे तब्बल २५०० हुन अधिक प्रयोग झाले होते. ह्या नाटकाला राष्ट्रपती पदक विजेता नाटक म्हणून ओळख मिळाली होती. जयमाला इनामदार ह्यांचे सासरे डॉक्टर अप्पासाहेब इनामदार ह्यांच्या नंतर पती प्रकाश इनामदार ह्यांनी कलासंगम सांभाळलं आता कलासंगमची धुरा जेष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार सांभाळताना पाहायला मिळतात. गेली ५५ वर्ष त्यांनी रंगभूमीची सेवा केली.

actress jaymala inamdar and  suhasini deshpande
actress jaymala inamdar and suhasini deshpande

मागच्या दीड वर्षांपासून चित्रपटाचे शूटिंग आणि नाटकाचे प्रयोग बंद आहेत. नवरात्र गणेशोत्सव जत्रा यात्रा देखील बंद आहेत त्यामुळे छोट्या मोठ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आमची रोजी रोटी बंद आहे. साठवलेला पैसा संपलाय, अश्या परिस्थितीत उतार वयात दुसरं कुठलंही काम करण्याचा अनुभव नाही. आजारी पडलोच तर हॉस्पिटलमध्ये जायची भीती वाटते. आम्हाला धड जगताही येईना आणि मरताही येईना आम्ही काय करायचं? असा आर्त सवाल ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांनी व्यक्त केला. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी तात्काळ प्रतिसाद देत आपल्या कोंढवा येथील आरएचपी हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ कलाकारांना पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत देण्याची घोषणा केली. आणि सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री जयमाला इनामदार यांचे डोळे पाणावले. त्यांनी रडतच हात जोडून आभार मानले. यावेळी उमेश चव्हाण यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे आणि जयमाला इनामदार यांना वाकून नमस्कार करून घाबरू नका, काळजी करू नका. मी आहे असे म्हणताच काही काळ वातावरण भावनिक झाले आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेक कलाकारांना यावेळी अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. निमित्त होते कलारंग परिवार सांस्कृतिक कला अकादमीच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्याचे यामध्ये श्री स्वामी समर्थ आदर्श समाज सेवा पुरस्कार रूग्ण हक्क परिषदेचे उमेश चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. शाल, गौरवचिन्ह, पिंपलवृक्षाचे रोप देऊन त्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन कलारंग परिवाराचे अध्यक्ष संतोष उभे यांनी केले होते. गायक चित्रसेन भवार, रविंद्र खराडे यांच्यासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *