
बॉलिवूड चित्रपटामुळे मराठी चित्रपटांना झालं पोहोचत होती मात्र आता दाक्षिणात्य चित्रपट सुपरडुपर हिट होत असल्याचे पाहून विजू माने यांनी यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे असे म्हटले होते. त्यांच्या या मुद्द्याचा अनुभव नुकताच शेर शिवराज चित्रपटाने अनुभवला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेर शिवराज चित्रपटाला स्क्रीन मिळणे कठीण झाले आहे. चित्रपट गृह मालक स्वतःची मनमानी करत बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटांना स्क्रीन राखून ठेवताना दिसले आहेत. त्यामुळे मराठी चित्रपट अडचणीत सापडले आहेत. विशेष म्हणजे काही थिएटरमालकांनी शेर शिवराज चित्रपटासाठी रात्रीचे शो ठेवले आहेत या वेळेत प्रेक्षकांचा खूप कमी प्रतिसाद मिळत आहे.

त्यामुळे मराठी चित्रपटाला आर्थिक झळ पोहोचणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. याबाबत मराठी कलाकारांनीच नव्हे तर छत्रपतींवर प्रेम असलेल्या तमाम प्रेक्षकांनी या विरोधात आवाज उठवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सध्या मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळाव्यात अशी मागणी जोर धरताना दिसत आहेत. चित्रपटावर अनेक कलाकारांचे पोट विसंबून आहे असेही या कलाकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे या गोष्टीचा विचार करणे खूप गरजेचे आहे असेही त्यांचे म्हणणे आहे. मात्र दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपट दर्जेदार असल्याचेही म्हटले जाते. उत्तम कथानक , ऍक्शन सीन्स, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि तगडे नायक ही या दाक्षिणात्य सृष्टीची जमेची बाजू आहे. या चित्रपटामुळे केवळ मराठी चित्रपटच नव्हे तर बॉलिवूड चित्रपट देखील झळ सोसताना पाहायला मिळाले आहेत. यावर मराठी चित्रपट क्षेत्राने विचार करणे गरजेचे आहे. चित्रपटांचा दर्जा सुधारला की प्रेक्षक मराठी चित्रपट नक्की पाहतील असे मत काही प्रेक्षक सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. या प्रेक्षकांसाठी विजू माने यांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्यात विजू माने यांनी चंद्रमुखी चित्रपटाचे कौतुक केलेले पाहायला मिळत आहे.

जे प्रेक्षक मराठी चित्रपटांना आशय हवा, विषय हवा, साहित्य हवं, नृत्य हवं, भव्य संगीत हवं, काव्य संगीत हवं, इमोशन हवं, प्रमोशन हवं? अशी मागणी करतात त्या प्रेक्षकांसाठी चंद्रमुखी हा चित्रपट योग्य पर्याय आहे असे त्यांनी म्हटले आहे. ह्या सर्व गोष्टी एकाच चित्रपटात अनुभवायच्या असतील तर त्या प्रेक्षकांनी थिटरात जाऊन हा सिनेमा नक्की बघावा असे त्यांनी सुचवले आहे. आज २९ एप्रिल रोजी चंद्रमुखी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक वेगवेगळे प्रयोग करण्यात आले होते. अगदी मेट्रो असो वा एरोप्लेन जिथे जिथे जाणे शक्य होईल त्या ठिकाणी अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांनी चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. मात्र येत्या काही दिवसात मराठी चित्रपटांना स्क्रिनिंग वाढवून मिळाल्यास हे चित्रपट बॉक्सऑफीसवर धुमाकूळ घालतील असा विश्वास सगळ्यांना आहे.