Breaking News
Home / ठळक बातम्या / ह्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर आला होता चोरीचा आळ,बेंबीच्या देठापासून ओरडून मला त्यांना सांगायचं होतं की

ह्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीवर आला होता चोरीचा आळ,बेंबीच्या देठापासून ओरडून मला त्यांना सांगायचं होतं की

गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिची प्रेग्नन्सीवरची एक पोस्ट व्हायरल झाली होती. प्रेग्नन्सीचे फोटो सतत पोस्ट केल्यामुळे काही महिलांनीच अभिनेत्री उर्मिलाला ट्रोल केले असल्यामुळे ती चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा उर्मिलाने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्या ब्रॅंडमुळॆ उर्मिला निंबाळकर हिच्यावर चोरीचा आरोप केला होता त्याच ब्रॅंडने आज तिला काम करण्याची संधी दिली आहे. हे प्रकरण नेमके काय आहे ते जाणून घेऊयात घेतल्यावर तुम्हाला देखील धक्का बसेल …

actress urmila nimbalkar
actress urmila nimbalkar

एका कॉस्मेटिकची सर्वात महागडी लिपस्टिक उर्मिला निंबाळकर वापरत असे. ज्या काळात मुख्य अभिनेत्री कडेही ही लिपस्टिक पाहायला मिळायची नाही ती लिपस्टिक उर्मिलाकडे कशी? असा सवाल त्यावेळी उपस्थित केला गेला. तेव्हा तिच्यावर चोरीचा आळ घालण्यात आला होता. उर्मिला आपल्या पोस्टमध्ये अधिक काय म्हणाली ते पाहुयात…” तर झालं असं.. एका मोठ्या हिंदी मालिकेच्या सेटवर, त्या मालिकेतील हिरोईनची मेकअप आणि हेअर ड्रायर ची बॅग चोरीला गेली. त्याचवेळेस पैसे साठवून मी एका कंपनीची महागडी लिपस्टिक विकत घेतली होती. तेवढी एकच लिपस्टिक अप्रतिम क्वालिटीची, ब्रॅंडेड आणि माझा ओठांना रॅश न येऊ देणारी असल्यामुळे मी प्रत्तेकच शुटिंगमधे ती वापरायचे. मराठी कलाकाराच्या पर डे पेक्षा मोठ्या किंमतीची लिपस्टिक माझ्या हातात दिसल्याने, माझ्यावर चोरीचा पहिला संशय घेण्यात आला. या प्रकरणात माझा काहीही संबंध नसल्याने, साहजिकच त्यांना मी माझी संपुर्ण बॅग चेक करु दिली. माझा मोठा भाऊ भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी म्हणून निवडला गेलेला असून, माझे वडिल व्याख्यान आणि प्रवचने करतात.

urmila nimbalkar news
urmila nimbalkar news

माझ्या कुटुंबातील प्रत्तेक पुरुष पिढ्यांपिढ्या शेती करतोय. कलेचा कसलाही वारसा नसलेल्या कुटुंबातील मी पहिलीच मुलगी आहे, जी एकटी २ बस आणि २ लोकल बदलून, मुंबईत प्रामाणिकपणे ॲाडिशन पास करुन, सेटवरील एकमेव मराठी कलाकार असूनही वेगळ्या भाषेत काम करतीय. बेंबीच्या देठापासून ओरडून मला त्यांना सांगायचं होतं की मी चोर नाही. त्या माझ्या सर्वात आवडत्या एकमेव लिपस्टिक मुळे माझी डायरेक्ट लायकी काढण्यात आली होती. इतकं अपमानास्पद कधीच वाटलं नव्हतं मला. परवा त्याच लिपस्टिक कंपनीचा मला मेल आला, आम्हाला तुमच्या मराठी युट्यूब चॅनेलवर आमचं नविन प्रॅाडक्ट पहिल्यांदा लॅांच करायचंय आणि आम्ही तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रेयेचे तुम्हाला पैसे देऊ! तुम्ही तुमच्या गोड मराठी भाषेतच बोला हा त्यांचा आग्रह होता.
आपल्या आवडत्या ब्रॅंडबरोबर काम करुन पैसे मिळवण्याचा आनंद आहेच पण माझा हा प्रवास मलाच आनंदाचा अभिमानाचा वाटतो!”…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *