मराठी चित्रपट अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्या विरोधात पत्नी स्नेहा चव्हाण हिने नुकतीच एक तक्रार दाखल केली आहे. अनिकेत विश्वासरावची पत्नी स्नेहा चव्हाण ही मराठी चित्रपट अभिनेत्री आहे या दोघांनी २०१८ साली मोठ्या थाटात लग्न केले होते. मात्र लग्नानंतर काही दिवसातच अनिकेत स्नेहाला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ लागला असे तिने या तक्रारीत म्हटले आहे. फेब्रुवारी २०२१मध्ये स्नेहा आपल्या माहेरी पुण्यात परत आली होती. त्यानंतर तिने अलंकार पोलीस ठाण्यात मानसिक व शारीरीक छळ केल्याची फिर्याद दिली असून …

पोलिसांनी अनिकेत विश्वासराव याच्यावर नुकताच गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत विश्वासराव ह्याने स्नेहाचे करिअर होऊन नये आपल्या पेक्षा ती वरचढ ठरू नये म्हणून तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत अनिकेतने स्नेहाला त्रास देऊन तिला मारहाण केली. एवढेच नाही तर तो लोकांसमोरच स्नेहाला अपमानास्पद वागणूक देत होता. दरम्यान तो तिला धमक्या देऊन , शारीरिक त्रास देऊन तिचा गळा दाबून जीवे मारण्याच्या प्रयत्न करत होता असे स्नेहाने तिच्या फिर्यादीत म्हटले आहे. बाहेर अनैतिक संबंध आहेत आणि तुझे करीअर होऊ नये याहेतून अनिकेत स्नेहाची छळवणूक करू लागला. मुंबईतील दहिसर येथे अनिकेतचे कुटुंब विश्वासराव रेडिडेन्सी मध्ये वास्तव्यास आहे. दरम्यान या प्रकरणी स्नेहाच्या सासू सासऱ्यांनी स्नेहाची छळवणूक होत असल्याचा दुजोरा दिला आहे. २०१८ साली स्नेहा आणि अनिकेत या दोघांनी हृदयात समथिंग समथिंग या चित्रपटात एकत्रित काम केले होते.

स्नेहाने नागपूर अधिवेशन, 702 दीक्षित अशा मोजक्याच चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. दरम्यान रंगसंस्कार प्रोडक्शनची बॅक टू स्कुल या आगामी चित्रपटात ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर अनिकेत विश्वासराव याने देखील मराठी चित्रपटातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पोश्टर गर्ल, पोश्टर बाईज, चोरीचा मामला, आंधळी कोशिंबीर, फक्त लढ म्हणा या चित्रपटातून तो झळकला आहे. अनिकेत विश्वासराव याच्या विरोधात स्नेहाने तक्रार दाखल केली असून अनिकेतच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. दरम्यान अनिकेत ने स्नेहाने लावलेल्या आरोपांवर अजून कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मराठी अभिनेत्रीने तिच्या अभिनेता असलेल्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केलेली हि पहिलीच वेळ असावी ह्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीत वेगळेच वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळते आहे.